
cat
CAT 2026 Last Date Today: एमबीए (MBA) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘कॉमन ॲडमिशन टेस्ट’ (CAT 2026) ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आयआयएमद्वारे कॅट २०२६ परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आज, १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी काही कारणास्तव अद्याप अर्ज भरलेला नाही, त्यांनी कोणताही विलंब न करता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. आजनंतर अर्जाची विंडो बंद केली जाईल.
ओपन / EWS / NC-OBC प्रवर्ग: किमान ५०% गुणांसह ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणे आवश्यक.
SC / ST / PwBD प्रवर्ग: किमान ४५% गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
व्यावसायिक पदवी: निर्धारित टक्क्यांसह CA / CS / ICWA (CMA) / Fellow of the Institute of Actuaries of India (FIAI) ही पदवी पूर्ण केलेली असावी.
अंतिम वर्षातील विद्यार्थी: पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थीदेखील या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
उमेदवार स्वतः खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.
१. सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर जा.
२. होमपेजवर ‘New Candidate Registration’ लिंकवर क्लिक करून मागितलेली माहिती भरा आणि नोंदणी करा.
३. नोंदणी झाल्यानंतर ‘Registered Candidate Login’ वर क्लिक करून इतर सर्व तपशील भरा.
४. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि निश्चित केलेले परीक्षा शुल्क भरा.
५. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रिंटआऊट भविष्यातील संदर्भासाठी नक्की काढून ठेवा.
SC / ST / PwBD प्रवर्ग: ₹१,३५०/-
इतर सर्व प्रवर्ग (General / OBC / EWS): ₹२,७००/-
NTA Office Shifted: नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे कार्यालय नव्या पत्त्यावर! विद्यार्थ्यांसाठी NTA ने जारी केला डिटेल्स
अधिकृत माहितीनुसार, IIM CAT 2026 परीक्षा २९ नोव्हेंबर २०२६ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाईल. तर अर्जदार उमेदवारांचे प्रवेशपत्र (Admit Card) ४ नोव्हेंबर २०२६ पासून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.