Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE आणि NCERT कडून शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनिंग’; ९ वीचा नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे शिकवण्याची आखली रणनीती

NCERT Maths Science Textbooks : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत इयत्ता ९ वीची नवीन गणित व विज्ञानाची पुस्तके प्रभावीपणे शिकवण्यासाठी CBSE आणि NCERT ने शिक्षकांसाठी ओरिएंटेशन वर्कशॉप आयोजित केले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 21, 2026 | 09:29 AM
cbse and ncert

cbse and ncert

Follow Us
Follow Us:

CBSE Class 9 New Syllabus 2026: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) आणि NCF-SE 2023 अंतर्गत शालेय शिक्षणात सातत्याने बदल केले जात आहेत. याच दिशेने आता इयत्ता ९ वीची गणिताची आणि विज्ञानाची नवीन पुस्तके प्रभावीपणे शिकवण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने’ ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या’ सहकार्याने शिक्षकांसाठी एक विशेष ओरिएंटेशन वर्कशॉप आयोजित केले. शिक्षकांना नवीन पुस्तकांची रचना, शिकवण्याच्या पद्धती आणि वर्गात त्यांचा अधिक चांगला वापर कसा करावा, याची माहिती देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता, जेणेकरून विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम सहज समजेल.

दिल्लीत आयोजित करण्यात आले शिक्षकांचे ओरिएंटेशन वर्कशॉप

CBSE आणि NCERT कडून हे ओरिएंटेशन वर्कशॉप नवी दिल्लीतील द्वारका येथील ‘CBSE इंटिग्रेटेड ऑफिस कॉम्प्लेक्स’मध्ये आयोजित करण्यात आले होते. यामध्ये CBSE शी संलग्न शाळांमधील एकूण ११० शिक्षकांनी भाग घेतला. यामध्ये गणिताचे ५८ आणि विज्ञानाच्या ५२ शिक्षकांचा समावेश होता. याशिवाय ‘केंद्रीय विद्यालय संघटन’ (KVS) आणि ‘नव्होदय विद्यालय समिती’चे (NVS) प्रतिनिधी देखील या वर्कशॉपचा भाग बनले.

वर्कशॉपमध्ये शिक्षकांना काय शिकवण्यात आले?

वर्कशॉपमधील सर्व सत्रे NCERT च्या तज्ज्ञांनी आयोजित केली होती. त्यांनी इयत्ता ९ वीच्या गणित आणि विज्ञानाच्या नवीन पुस्तकांमागील विचार, त्यांची रचना आणि वर्गात ते प्रभावीपणे शिकवण्याच्या पद्धतींबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना सांगण्यात आले की, विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतर करण्याऐवजी विषय समजून घेऊन ते दैनंदिन जीवनाशी जोडून शिकण्यासाठी त्यांना कसे प्रोत्साहित करावे.

US Green Card: अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना मोठा झटका! ग्रीन कार्डसाठी मोजावे लागणार तब्बल ९६ लाख रुपये; ट्रम्प सरकारचा नवा प्लॅन

‘या’ मुद्द्यांवर राहिला विशेष भर

प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना ‘क्षमता आधारित शिक्षण’ (Competency-Based Learning) पद्धतीची माहिती देण्यात आली. यासोबतच ‘अनुभवजन्य शिक्षण’ (Experiential Learning) पद्धतीद्वारे पुस्तकातील विषय दैनंदिन आयुष्याशी जोडण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांची विश्लेषणात्मक क्षमता वाढवण्यासाठी ‘समस्या निवारण कौशल्य’ तंत्रांवरही चर्चा झाली. याशिवाय ‘सर्वसमावेशक मूल्यांकन’ पद्धती समजावून सांगण्यात आल्या, ज्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि NCF-SE 2023 च्या धोरणांना अनुसरून आहेत.

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये ऑफिसर पदांची मोठी भरती! ७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची सुवर्णसंधी

‘मास्तर ट्रेनर’ बनून पुढे नेणार नवीन शिक्षण व्यवस्था

CBSE नुसार, या वर्कशॉपचा उद्देश शिक्षकांना ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून तयार करणे हा आहे. हे प्रशिक्षित शिक्षक पुढे जाऊन CBSE शी संलग्न शाळांमध्ये नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे लागू करण्यास मदत करतील. बोर्डाचे म्हणणे आहे की, या प्रशिक्षणामुळे शिक्षक नवीन पुस्तकांचे शैक्षणिक उद्दिष्ट अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील आणि वर्गात अशा शिक्षण पद्धतींचा अवलंब करतील ज्या विद्यार्थ्यांमध्ये ‘विचारक्षमता’, ‘प्रयोग आधारित शिक्षण’ आणि विषयांची सखोल समज विकसित करण्यास मदत करतील.

Web Title: Cbse ncert class 9 new maths science textbooks teacher orientation workshop 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • CBSE
  • education

संबंधित बातम्या

Victoria University India: ऑस्ट्रेलियाच्या ‘व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी’ला यूजीसीची मंजुरी! ‘या’ शहरात सुरू होणार कॅम्पस
1

Victoria University India: ऑस्ट्रेलियाच्या ‘व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी’ला यूजीसीची मंजुरी! ‘या’ शहरात सुरू होणार कॅम्पस

Oldest School In India: तब्बल ३०० वर्षांहून अधिक काळ अविरत सुरू असणारे ‘हे’ भारतातील सर्वात जुने स्कूल!
2

Oldest School In India: तब्बल ३०० वर्षांहून अधिक काळ अविरत सुरू असणारे ‘हे’ भारतातील सर्वात जुने स्कूल!

ISRO Exit Rules: इस्रोमधून दरवर्षी १२० शास्त्रज्ञांचे राजीनामे; परंतू कर्मचाऱ्यांच्या गळतीमागील नेमके कारण काय? जाणून घ्या
3

ISRO Exit Rules: इस्रोमधून दरवर्षी १२० शास्त्रज्ञांचे राजीनामे; परंतू कर्मचाऱ्यांच्या गळतीमागील नेमके कारण काय? जाणून घ्या

Diploma Admission 2026: डीटीई महाराष्ट्र पॉलिटेक्निकची पहिली फेरी जाहीर; कॉलेज मिळाल्यानंतर पुढे काय करावे? वाचा सविस्तर
4

Diploma Admission 2026: डीटीई महाराष्ट्र पॉलिटेक्निकची पहिली फेरी जाहीर; कॉलेज मिळाल्यानंतर पुढे काय करावे? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.