Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE 3 Language Formula: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या सक्तीपासून मोठा दिलासा!

CBSE 3 Language Formula: सुप्रीम कोर्टाने CBSE च्या 'थ्री लँग्वेज फॉर्म्युला' प्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या सक्तीतून वगळण्यात आले असून हे धोरण आता १ एप्रिल २०२७ पासून लागू होईल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 29, 2026 | 11:24 AM
three language policy

three language policy

Follow Us
Follow Us:

CBSE 3 Language Formula: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) ‘थ्री लँग्वेज फॉर्म्युला’ संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना इयत्ता ६ वीच्या वर्गात तिसरी भाषा शिकवण्याच्या सक्तीला स्थगिती दिली आहे. तसेच, इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनाही आता इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच भाषा निवडीची सूट असेल, असे स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे आता इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांचे तिसऱ्या भाषेचे मूल्यांकन देखील शाळा स्तरावरच केले जाणार आहे.

यासोबतच न्यायालयाने ‘थ्री लँग्वेज फॉर्म्युला’ नवीन शैक्षणिक सत्र २०२७-२८ पासून लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, CBSE चे हे धोरण आता १ एप्रिल २०२७ पासून देशभरात अधिकृतपणे लागू केले जाईल.

१ एप्रिल २०२७ पासून लागू होणार फॉर्म्युला

यापूर्वी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला ही व्यवस्था पुढच्या वर्षापासून लागू करण्याबाबत विचार करण्याचा सल्ला दिला होता. यावर केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला होता की, देशातील जवळपास ९९ टक्के शाळांमध्ये तिसऱ्या भाषेच्या शिक्षणाची पूर्ण तयारी झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांवरील ताण आणि व्यवस्थेचा विचार करून न्यायालयाने हे धोरण चालू शैक्षणिक सत्रात जबरदस्तीने न राबवता १ एप्रिल २०२७ पासून लागू करण्याचे आदेश दिले.

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!

दोन भारतीय भाषांसह शिकावी लागणार एक विदेशी भाषा

कोर्टाच्या या आदेशानुसार, जे विद्यार्थी पुढील वर्षी इयत्ता ६ वीत जातील, त्यांना नियमानुसार दोन भारतीय भाषा आणि एक विदेशी भाषा शिकावी लागेल. यामध्ये इंग्रजी भाषेचा समावेश ‘विदेशी भाषा’ म्हणून करण्यात आला आहे.

दुसरीकडे, सध्या इयत्ता ७ वी आणि ८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच काही सवलती देण्यात आल्या आहेत. हे विद्यार्थी जर आधीपासूनच दोन गैर-भारतीय भाषा (उदा. इंग्रजी आणि फ्रेंच) शिकत असतील, तर ते त्या सुरू ठेवून तिसरी भाषा (R3) म्हणून कोणतीही एक भारतीय भाषा निवडू शकतात. सध्याच्या इयत्ता ७ वी ते १० वी च्या वर्गांसाठी R3 ची कोणतीही केंद्रीय बोर्ड परीक्षा असणार नाही, तर याचे अंतर्गत मूल्यांकन पूर्णपणे शाळा स्तरावरच होईल. कोर्टाच्या नवीन आदेशानंतर आता हीच व्यवस्था इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील लागू झाली आहे.

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..

नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार पुन्हा संधी

सीबीएसईने (CBSE) आपल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे की, इयत्ता ९ वी मध्ये R3 (तिसरी भाषा) च्या अंतर्गत मुलाल्यमानात जे विद्यार्थी यशस्वी होऊ शकणार नाहीत, त्यांनाही इयत्ता १० वी मध्ये बढती दिली जाईल. अशा विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी मध्ये R3 च्या अंतर्गत परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली जाईल. १० वी च्या बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठी शाळेकडून मिळालेले R3 उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे मात्र अनिवार्य असणार आहे.

Web Title: Cbse three language formula supreme court decision class 6 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • CBSC
  • education
  • language
  • Policy

संबंधित बातम्या

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..
1

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..

11th Admission 2026: शैक्षणिक वर्ष संपत आले तरी प्रवेश सुरूच; राज्यात अकरावीच्या तब्बल ८.८५ लाख जागा रिक्त!
2

11th Admission 2026: शैक्षणिक वर्ष संपत आले तरी प्रवेश सुरूच; राज्यात अकरावीच्या तब्बल ८.८५ लाख जागा रिक्त!

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!
3

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?
4

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.