फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IGNOU Non Teaching Recruitment 2026: जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल किंवा टेक्निकल क्षेत्रात अनुभव असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) विविध नॉन-टीचिंग पदांवर भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेच्या माध्यमातून असिस्टंट डायरेक्टर, टेक्निकल मॅनेजर आणि टेक्निकल असिस्टंट यांसारख्या तांत्रिक पदांच्या एकूण १४ जागा भरल्या जाणार आहेत.
या भरतीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (LMS), नेटवर्किंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), ॲनिमेशन, गेम डिझाइन आणि VR/AR यांसारख्या आधुनिक तांत्रिक क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. IGNOU च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून, २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
असिस्टंट डायरेक्टर : २ जागा (७ वा वेतन आयोग, लेव्हल-१०)
टेक्निकल मॅनेजर : ४ जागा (७ वा वेतन आयोग, लेव्हल-१०)
टेक्निकल असिस्टंट : ८ जागा (७ वा वेतन आयोग, लेव्हल-८)
एकूण रिक्त जागा: १४
शैक्षणिक पात्रता: या पदांसाठी मुख्यत्वे कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील पदवी मागितली आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E./B.Tech (CS/IT), M.Sc (CS/IT) किंवा MCA ची पदवी असणे आवश्यक आहे. पदवीमध्ये किमान ५५% गुण असणे अनिवार्य आहे.
कामाचा अनुभव: पदांनुसार अनुभवाची अट वेगवेगळी आहे.
टेक्निकल असिस्टंट: संबंधित तांत्रिक क्षेत्रात किमान ३ वर्षांचा अनुभव.
टेक्निकल मॅनेजर: किमान ५ वर्षांचा अनुभव.
असिस्टंट डायरेक्टर: संबंधित क्षेत्रात किमान १० वर्षांचा अनुभव (विशेष करून LMS आणि नेटवर्किंग क्षेत्रातील अनुभव).
उमेदवारांची कमाल वयोमर्यादा पदांनुसार निश्चित करण्यात आली आहे:
असिस्टंट डायरेक्टर: कमाल ४८ वर्षे
टेक्निकल मॅनेजर: कमाल ४२ वर्षे
टेक्निकल असिस्टंट: कमाल ३७ वर्षे (आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.)
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: ३ ऑक्टोबर २०२६
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २ नोव्हेंबर २०२६ (रात्री १२ वाजेपर्यंत)
ऑनलाइन अर्ज प्रिंट आणि कागदपत्रे जमा करण्याची अंतिम तारीख: १२ नोव्हेंबर २०२६
MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी IGNOU च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Career/Recruitment’ सेक्शनला भेट द्यावी. तिथे Advertisement No. 69/2026/Admn. अंतर्गत या भरतीची लिंक मिळेल. अर्जात विचारलेली सर्व शैक्षणिक आणि अनुभवाची माहिती अचूक भरून अर्ज पूर्ण करावा आणि त्यानंतर प्रिंट कॉपी आवश्यक कागदपत्रांसह निश्चित मुदतीत जमा करावी.






