Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC Exam 2026: ‘उपरवाला सब देख रहा है…’, बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांना CCTV ने पकडलं; १९ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड

मंगळवारी झालेल्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून सामूहिक काॅपी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, परीक्षा केंद्रावर उपलब्ध CCTV फुटेजच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 11, 2026 | 03:03 PM
बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांना CCTV ने पकडलं; १९ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड (Photo Credit- X)

बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांना CCTV ने पकडलं; १९ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • ‘उपरवाला सब देख रहा है!’
  • बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांना CCTV ने पकडलं
  • १९ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर (ता. कन्नड) येथे इयत्ता १२ वीच्या इंग्रजी पेपर परीक्षेदरम्यान आढळून आलेल्या गैरप्रकाराच्या प्रकरणात दक्षता समितीच्या आदेशानुसार व्यापक व कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्ह्यातील आजपर्यंतच्या सर्वांत मोठ्या परीक्षा-संबंधित कारवायांपैकी एक मानली जात आहे.

मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून सामूहिक काॅपी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, परीक्षा केंद्रावर उपलब्ध CCTV फुटेजच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीत विद्यार्थ्यांकडून एकमेकांच्या उत्तरपत्रिकांकडे पाहून गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण १९ जणांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षक व बैठे पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. तसेच, इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात त्यांच्या संस्थेमार्फत संस्थांतर्गत शिस्तभंगात्मक कार्यवाही करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या गैरप्रकाराचे गांभिर्य लक्षात घेता, प्रशासनाने या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफ बदलला असून, पुढील सर्व परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आदेश दिले.

‘उपरवाला देख रहा है’

ही संपूर्ण कारवाई शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली व सीताराम पवार विस्तार अधिकारी यांनी केली असून, जिल्हाभरात “उपरवाला सब देख रहा है” या म्हणीचा प्रत्यय देणारी ही घटना ठरली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात असल्याने, परीक्षा प्रक्रियेत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

परीक्षा पारदर्शक घेणे ही सामूहिक जबाबदारी

या प्रकरणातून सर्व परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक, बैठे पथक व संबंधित घटकांसाठी एक महत्त्वाचा धडा मिळण्यासारखा असून, भविष्यात परीक्षा अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नियमांनुसार घेणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दक्षता समितीच्या आदेशानुसार कारवाई

इयत्ता १२ वीच्या परीक्षेत गैरप्रकार; “उपरवाला सब देख रहा है “चा प्रत्यय देणारी सीसीटीव्ही आणि उत्तरांच्या झेरॉक्स प्रति आधारित ही कारवाई करण्यात आली. दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित, विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने केली.

Web Title: Cctv catches cheating students in class 12th exams 19 students suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • HSC Exam 2026

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ
1

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका
2

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!
3

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
4

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.