Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Government Scholarship: पैशांअभावी शिक्षण सुटणार नाही! जाणून घ्या सरकारच्या ‘NMMSS’ स्कॉलरशिपबद्दल सविस्तर..

Central Government Scholarship : केंद्र सरकारच्या नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप (NMMSS) योजनेची माहिती. इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी १२,००० रुपयांची आर्थिक मदत. पात्रता अटी आणि निवड प्रक्रिया सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 30, 2026 | 02:27 PM
nmmss

nmmss

Follow Us
Follow Us:

NMMSS Scholarship Scheme: देशात आजही अशी लाखो मुले आहेत, जी अभ्यासात हुशार असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडतात. विशेषत: ग्रामीण भागात किंवा लहान शहरांमध्ये अनेक कुटुंबे आपल्या मुलांना आठवीनंतर पुढे शिकवू शकत नाहीत. परंतु, अशा विद्यार्थ्यांसाठी आता सरकारची ‘नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम’ (NMMSS) ही उपयोगी ठरत आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सरकार दरवर्षी विद्यार्थ्याना आर्थिक मदत करते, जणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले शिक्षण पुढे सुरू ठेवू शकतील.

 दरमहा मिळणार १,००० रुपये

केंद्र सरकारच्या (Central Government Scholarship) या योजनेअंतर्गत निवडलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १,००० रुपयांची आर्थिक सहाय्यता विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते, म्हणजेच दरवर्षी १२,००० रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून मिळते. ही मदत इयत्ता ९ वीपासून ते १२ वीपर्यंत दिली जाते. थोडक्यात, एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त चार वर्षांपर्यंत या योजनेचा लाभ मिळू शकतो. पैशांच्या आभावामुळे कोणत्याही मुलाच्या शिक्षणाचा मार्ग रोखला जाऊ नये, हाच सरकारचा यामागील स्पष्ट उद्देश आहे.

कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार फायदा? 

जे विद्यार्थी सरकारी शाळा, शासकीय, अनुदानित शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका/जिल्हा परिषद) शाळांमध्ये शिकत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. परंतु, जवाहर नवोद्य विद्यालय, केंद्रीय विद्यालय आणि खाजगी निवासी किंवा बोर्डिंग शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेस पात्र मानले जात नाही.

DK Shivakumar: राजकारणाच्या मैदानावर शिक्षणाचा ‘मास्टरस्ट्रोक’; एकदा वाचाच कर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यांचा शैक्षणिक प्रवास!

सरकारने या योजनेसाठी शैक्षणिक गुणवत्तेशी संबंधित काही अटीही निश्चित केल्या आहेत. विद्यार्थ्याला इयत्ता ७ वीमध्ये किमान ५५% गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी यामध्ये ५%ची सवलत देण्यात आली आहे. म्हणजेच कष्टाळू आणि हुशार मुलांना पुढे जाण्याची संधी या स्कॉलरशिपद्वारे मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न ३.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया कशी होते?

NMMSS शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एक परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा राज्य स्तरावर आयोजित केली जाते. यामध्ये अभ्यासाशी संबंधित प्रश्न विचारलले जातात. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करतात, त्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होते.

BSNL मध्ये इंजिनिअर्ससाठी बंपर भरती; निवड प्रक्रिया आणि पात्रता निकष वाचा एका क्लिकवर..

Web Title: Central government scholarship nmmss apply eligibility criteria exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • central goverment
  • Scholarship Exam

संबंधित बातम्या

Government Job Vacancies: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत अजून किती पदे रिक्त? आरटीआयच्या अहवालातून समोर आली आकडेवारी!
1

Government Job Vacancies: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत अजून किती पदे रिक्त? आरटीआयच्या अहवालातून समोर आली आकडेवारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.