फोटो सौजन्य- सोशल मीडिया
BSNL JTO Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या पदवीधरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) ज्युनिअर टेलीकॉम ऑफिसर (JTO) भरती २०२६ ची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत देशभरात एकूण १०० रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेअंतर्गत कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ परिमंडळात सर्वाधिक पदे उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेद्वार ४ जून २०२६ पासून बीएसएनएलच्या अधिकृत संकेतस्थळावर(Website) जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेद्वार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून बी.ई./बी.टेक. (B.E./B.Tech.) किंवा सम कक्ष इंजिनिअरिंग पदवी असणे अनिवार्य आहे. टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
उमेद्वाराचे वय किमान २० वर्ष ते ३० कमाल वर्ष निश्चित करण्यात आले आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेद्वारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील २००० रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे, तर एससी, एसटी किंवा दिव्यांग उमेद्वारांना १००० रुपये भरावे लागतील.
या पदांसाठी उमेद्वारांची निवड कॉम्प्युटर आधारित परीक्षेच्या (CBT) माध्यमातून केली जाईल. या परीक्षेत इंजिनिअरिंग विषयांसोबत जनरल अबिलिटी (General Ability) आणि सामान्य ज्ञानावर (General Knowledge) आधारित प्रश्न विचारले जातील. एकूण १२० प्रश्नांची ही परीक्षा ४८० गुणाची असेल.
निवड झालेल्या उमेद्वारांना १६,४०० रुपयांपासून ते ४०,५०० रूपयांपर्यंत वेतनमान दिले जाईल. याशिवाय, त्यांना सरकारी नोकरीत मिळणारे विविध भत्ते आणि इतर सुविधांचाही लाभ मिळेल.






