Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार CET Cell Student Assistance Center; विद्यार्थ्यांना काय होणार फायदा? पहा एका क्लिकवर..

CET Cell Student Assistance Center: विद्यार्थ्यांना त्यांच्याच जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्तीचे अचूक मार्गदर्शन मिळण्यासाठी ४० सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू होणार आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 09, 2026 | 04:24 PM
सीईटी

सीईटी

Follow Us
Follow Us:

नीता परब, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

CET Cell Student Assistance Center: राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया , शिष्यवृत्ती योजना आणि प्रवेश प्रक्रिया संदर्भात अचूक माहिती योग्य मार्गदर्शन हे त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विश्वासार्ह माहिती, अचूक मार्गदर्शन सहजपणे त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील कामांसाठी वारंवार मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता भासू नये. त्यांना प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती, विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती तसेच आवश्यक मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, या हेतूने ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू होणार

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात येत असून मुंबईत तीन, पुण्यात दोन आणि नागपुरात दोन केंद्रे असतील. यापैकी २६ केंद्रांचे काम पूर्ण झाले असून सहा केंद्रे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित आठ केंद्रेही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

FYJC 11th Admission: मुंबईत ७६ हजारांहून अधिक अकरावी प्रवेश निश्चित; पण अद्याप किती लाख जागा रिक्त आहेत? जाणून घ्या आकडेवारी!

केंद्र स्थापनेचा उद्देशः

जिल्हयातील शैक्षणिक संस्था, कक्षाच्या अधिनस्त कार्यरत असलेलेल परिक्षा केंद्र व राज्य सामाईक प्रवेश परीक्षा यांच्यात समन्वय व संवाद साधणे.
परिक्षार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील विषय तसेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया संबंधित आवश्यक ती सर्व तांत्रिक व इतर माहिती देणे.
विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन, तक्रारीचे निवारण तसेच प्रलंबित तक्रारी संबंधी योग्य कार्यालये, अधिकारी यांच्या कडून माहिती प्राप्त करुन घेऊन तक्रार निवारण करणे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, पात्रता व क्षमतेनुसार योग्य अभ्यासक्रम, पदवी व शैक्षणिक संस्थांची निवड करण्याबाबत मार्गदर्शन करणे.
सीईटी परीक्षा व कॅप फेऱ्यांशी संबंधित अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षा पद्धत, वेळापत्रक तसेच अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.
विविध शिष्यवृत्ती योजना, त्याचे पात्रता निकष याविषयी माहित विद्यार्थ्यांना पुरविणे.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनंतर, प्रवेश निश्चितीबाबतचे शंकांचे निराकरण करणे.
करिअर मार्गदर्शन व अंदाजात्मक समुपदेशन प्रदान करणे.
कॅप , सीईटी पोर्टल व परीक्षा प्रक्रियेशी संबंधित प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना फ्रंट डेस्कवर प्रत्यक्ष सहाय्य उपलब्ध करून देणे, त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे, परीक्षा केंद्रावरील आचारसंहिता इत्यादींचा समावेश राहील.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक समुपदेशन तसेच इंटर्नशिप व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करणे.
अर्ज भरणे, अर्ज शुल्क भरणा, कागदपत्रे अपलोड करणे, प्रवेशपत्र संबंधित अडचणी तसेच कॅप/ सीईटी फॉर्म मार्गदर्शन यासाठी सहाय्य करणे.
तांत्रिक व पेमेंटशी संबंधित तक्रारी / शंका (पेमेंट गेटवे समस्या, कागदपत्रे / छायाचित्र /स्वाक्षरी अद्ययावत करणे, दस्तऐवजीकरणातील त्रुटी इत्यादी) हाताळणे.
विद्यार्थ्यांच्या चौकशी व तक्रारींची निवारण करणे व आवश्यकतेनुसार उच्चस्तरीय निवारणासाठी पुढे पाठवणे.
अशा प्रकारे या केंद्राच्या सेवा दिनांक १० जून २०२६पासून सुरू होणार आहेत.

CBSE 12th Result Controversy: दिल्ली ते सौदी अरेबियापर्यंत तक्रारींचा पाऊस; सीबीएसईच्या डिजिटल पेपर तपासणीत मोठा घोळ?

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर तसेच जिल्हास्तरीय समन्वयक ऑनलाइन उपस्थित होते. या बैठकीत सर्व जिल्ह्यातील सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्राचा आढावा घेण्यात आला.

Web Title: Cet cell student assistance center maharashtra chandrakant patil marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • CET Exam
  • chandraknt patil
  • education

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त
1

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त

School Sanchmanyata 2026: शाळांसाठी महत्त्वाची बातमी! संचमान्यता भरण्यासाठी आता ‘या’ तारखेची अंतिम मुदत असणार
2

School Sanchmanyata 2026: शाळांसाठी महत्त्वाची बातमी! संचमान्यता भरण्यासाठी आता ‘या’ तारखेची अंतिम मुदत असणार

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश
3

School Dropouts: एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष शोधमोहीम राबवण्याचे निर्देश

NEET PG 2026 Result जाहीर; मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा कट ऑफ सर्वात खाली!
4

NEET PG 2026 Result जाहीर; मागील ६ वर्षांच्या तुलनेत यंदा कट ऑफ सर्वात खाली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.