Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cheapest IIM in India: एमबीए करायचयं! मग ‘या’ सर्वात स्वस्त आयआयएम संस्थांबद्दल नक्की जाणून घ्या

Cheapest IIM in India: आयआयएममधून एमबीए करायचे आहे पण २५ लाखांची फी परवडत नाही? वाचा देशातील सर्वात कमी फी असलेल्या 'बेबी आयआयएम' बद्दल, जिथे कमी खर्चात मिळते जागतिक दर्जाचे शिक्षण आणि दमदार प्लेसमेंट.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 04, 2026 | 11:11 AM
iim

iim

Follow Us
Follow Us:

Cheapest IIM in India:  एमबीए करू इच्छिणारा प्रत्येक विद्यार्थी आयआयएम (IIM) मध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पाहतो. परंतु, आयआयएममध्ये प्रवेश मिळवणे इतके सोपे तर नव्हेच त्यासोबत तेथील प्रवेशाचे बजेटही कित्येक लाखांच्या घरात आहे. यामुळे अनेक विद्यार्थी घाबरतात की, जर कॅट परीक्षा उत्तीर्ण झालो तरी २५ ते ३० लाख रुपयांची सोय कुठून होणार? परंतू, भारतातील सर्व आयआयएमची फी सारखी नाही. काही आयआयएम हे अत्यंत किफायतशीर बजेटमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण देतात. येथून एमबीए कोर्स करून तुम्ही केवळ कर्जाच्या (एज्युकेशन लोन) मोठ्या ओझ्यापासूनच वाचू शकत नाही, तर प्लेसमेंटच्या बाबतीतही तुमचे नशीब उजळू शकते.

सर्वात कमी फी असलेले आयआयएम कोणते?

जर तुम्ही सर्वात बजेट-फ्रेंडली आयआयएमच्या शोधात असाल, तर या यादीत आयआयएम अमृतसर (IIM Amritsar), आयआयएम सिरमौर (IIM Sirmaur) आणि आयआयएम बोधगया (IIM Bodhgaya) सर्वात वर आहेत. या तिन्ही संस्थांची फी २५ लाख ते २७ लाख रुपयांच्या दरम्यान असते, तिथे ‘बेबी आयआयएम’ सारख्या संस्थांमध्ये २ वर्षांच्या एमबीएचा एकूण खर्च सुमारे १६ लाख ते १८ लाख रुपयांच्या दरम्यान येतो. काही अहवालांनुसार, आयआयएम संबलपूरच्या (IIM Sambalpur) अनेक कोर्सेसची फी १३ लाख ते १५ लाख रुपयांच्या दरम्यान आहे, ज्यामुळे हा सर्वात स्वस्त पर्याय ठरतो.

CA Foundation Result मध्ये महाराष्ट्राचा डंका! देशात दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या अयानच्या यशाचा सीक्रेट फॉर्म्युला एकदा वाचाच..

नवीन आयआयएम संस्थांना ‘बेबी आयआयएम’ म्हटले जाते. या नवीन संस्था असून त्यांच्या पायाभूत सुविधा अजून पूर्णपणे विकसित झालेल्या नाहीत, तर काहींचे कॅम्पस अगदी नवीन बनले आहेत. म्हणूनच, जुन्या व्यवस्थापन संस्थांच्या (मॅनेजमेंट कॉलेज) तुलनेत यांची ट्यूशन फी कमी ठेवण्यात आली आहे.

अनेकदा विद्यार्थ्यांना असे वाटते की फी कमी असेल तर कंपन्याही छोट्या-मोठ्याच येतील. पण असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे! अखेर ब्रँड नेम ‘आयआयएम’ हेच आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही आयआयएम अमृतसर किंवा सिरमौरमध्ये १६ ते १७ लाख रुपये खर्च केले, तर तेथील सरासरी प्लेसमेंट पॅकेजदेखील वार्षिक १४ ते १६ लाख रुपयांपर्यंत जाते. याचा अर्थ असा की, तुम्ही जेवढे पैसे लावले, तेवढे तुम्हाला पहिल्याच वर्षाच्या पॅकेजमध्ये परत मिळतात.

CBSE New Chairman: CBSE च्या नव्या अध्याक्षपदी IAS प्रशांत लोखंडे यांची नियुक्ती; जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर..

कमी फी असण्याचे अनेक फायदे

कमी फी असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शिक्षणादरम्यान तुम्हाला एज्युकेशन लोनचे मोठे दडपण सहन करावे लागत नाही. जेव्हा तुम्ही २५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन उत्तीर्ण होता, तेव्हा दरमहा मोठा ईएमआय (EMI) भरण्याचा ताण असतो. ज्यामुळे तुम्ही करिअरमध्ये मोठी जोखीम घेण्यास किंवा स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्यास घाबरता. कमी फी असलेले आयआयएम हे स्वातंत्र्य देतात की तुम्ही कोणत्याही दडपणाशिवाय तुमच्या करिअरचे निर्णय घेऊ शकता. याशिवाय, येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी अनेक स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) योजना देखील उपलब्ध आहेत.

Web Title: Cheapest iim in india baby iim mba fees structure placement package benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!
1

AYUSH Admission 2026 : मेडिकलची पहिली प्रवेश यादी जाहीर; राज्यातील १०,५१९ विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार!

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?
2

Gautam Adani Education: अंबानींना मागे टाकत ‘हे’ बनले भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती शिकलेत माहितीये?

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त
3

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! IIIT Pune च्या संशोधन प्रकल्पांना केंद्र सरकारचे मोठे अनुदान प्राप्त

School Sanchmanyata 2026: शाळांसाठी महत्त्वाची बातमी! संचमान्यता भरण्यासाठी आता ‘या’ तारखेची अंतिम मुदत असणार
4

School Sanchmanyata 2026: शाळांसाठी महत्त्वाची बातमी! संचमान्यता भरण्यासाठी आता ‘या’ तारखेची अंतिम मुदत असणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.