
social media
Social Media Earning Tips: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, तर कमाईचा एक अत्यंत मोठा प्लॅटफॉर्म बनला आहे. जर तुमच्याकडे योग्य कला आणि जिद्द असेल, तर तुम्ही घरबसल्या आपले नशीब बदलू शकता. नुकतीच दिल्लीत राहणाऱ्या २३ वर्षीय उपासनाची कहाणी सोशल मीडियात मोठी चर्चेत आहे. तिने आपली चांगली नोकरी सोडून कंटेंट क्रिएशनच्या जगात पाऊल ठेवले आणि घवघवीत यश मिळवले.
बहुतांश लोकांचा असा गैरसमज असतो की, सोशल मीडियावर कमाई करण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी लाखो फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. परंतु, उपासना नावाच्या या तरुण क्रिएटरने हा समज खोटा ठरवला आहे. तिच्याकडे अवघे १४ हजार फॉलोअर्स असतानाही तिने ब्रँड कोलॅबोरेशनच्या माध्यमातून अवघ्या १ महिन्यात लाखांहून अधिक कमाई करून सर्वांना अचंबित केले आहे. सध्या ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून आपल्या पूर्वीच्या नोकरीपेक्षा कितीतरी जास्त कमाई करत आहे.
उपासना मागील दीड वर्षांपासून सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करत आहे. त्याआधी ती एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करत होती, जिथे तिला दरमहा ६० हजार रुपये पगार मिळत होता. परंतु, तिला स्वतःचे काहीतरी वेगळे करायचे होते, त्यामुळे तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. तिची ही मेहनत फळाला आली आणि सप्टेंबर महिना तिच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात यशस्वी ठरला. उपासना स्वतः एक व्हिडिओ शेअर करून खुलासा केला की, कशा प्रकारे केवळ १४ हजार फॉलोअर्सच्या मदतीने तिने १ लाख रुपयांपेक्षा जास्त कमाईचा टप्पा पार केला.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सप्टेंबर महिन्यातील कमाईचा संपूर्ण हिशोब मांडला. या काळात तिला एकूण ६ ब्रँड कोलॅबोरेशन मिळाले होते. त्यापैकी ५ डील्स तिच्या स्वतःच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यासाठी होत्या, तर १ डील ‘युजर जनरेटेड कंटेंट’ (UGC) म्हणजेच ब्रँड्ससाठी स्वतंत्रपणे व्हिडिओ किंवा फोटो तयार करून देण्याची होती. या यूजीसी डीलद्वारे तिला १५,००० रुपये मिळाले, तर उर्वरित ५ ब्रँड डील्समधून ९७,००० रुपयांची कमाई झाली. अशा प्रकारे तिच्या ६ कोलॅबोरेशनची एकूण किंमत १.१२ लाख रुपये इतकी होती.
विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर! CUET UG परीक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल; उमेदवारांचा वेळही वाचणार
उपासनाचे यश त्या सर्व तरुणांसाठी एक मोठी प्रेरणा आहे, जे कमी फॉलोअर्स पाहून निराश होतात. तिची ही कहाणी सिद्ध करते की, ब्रँड्सना नेहमीच मोठ्या संख्येने फॉलोअर्स नको असतात, तर त्यांना ‘एंगेजमेंट’ आणि योग्य ‘निच’ (Niche) ची गरज असते. जर तुमचा कंटेंट दर्जेदार असेल आणि तुमचे फॉलोअर्स तुमच्यावर विश्वास ठेवत असतील, तर कमी फॉलोअर्स असलेले छोटे क्रिएटर्सही ब्रँड्सची पहिली पसंती बनू शकतात. या घवघवीत यशामुळे सोशल मीडियावरील युजर्स उपासनाचे भरभरून कौतुक करत आहेत.