Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education in Stanford: स्टॅनफर्डमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? मग खर्चाचा हा आकडा आणि मिळणारा ‘रिटर्न’ एकदा नक्की पाहा!

अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये Cost of Education in Stanford किती आहे? ट्यूशन फीपासून हॉस्टेलपर्यंतचा खर्च आणि १.७४ कोटींच्या सरासरी पगाराबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 11, 2026 | 09:36 AM
stanford university

stanford university

Follow Us
Follow Us:

Cost of Education in Stanford : जेव्हा मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (MBA) पदवीसाठी देश निवडण्याचा प्रश्न येतो, तेव्हा बहुतेक भारतीय विद्यार्थी टॉप शिक्षण संस्थांना अधिक प्राधान्य देतात. त्यापैकी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी ही एक संस्था आहे. स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसला क्यूएस (QS) रँकिंगमध्ये अमेरिकेतील टॉप-५ संस्थांमध्ये स्थान आहे. येथे केवळ भारतातूनचे नव्हे तर जगातील अनेक देशातून विद्यार्थी येतात.

जर तुम्हीही एमबीए करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला येथील एकूण खर्चाची माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया स्टॅनफर्ड येथून एमबीए करण्याचा एकूण खर्च किती आहे आणि पदवीचे फायदे काय आहेत.

स्टॅनफर्डमध्ये एमबीए करण्याचा खर्च

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये दोन वर्षांचा एमबीए कोर्स आहे. युनिव्हर्सिटीच्या वेबसाइटवर ‘कॉस्ट ऑफ अटेंडन्स’ (COA) ची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ट्यूशन फी राहण्या-खाण्याचा खर्च आणि आरोग्य विम्यासाठी किती पैसे लागतील, याचा तपशील दिला आहे.

  •  ट्यूशन फी – ८५,७५५ डॉलर्स
  • वसतीगृह शुल्क- २१,५०७ डॉलर्स
  • राहण्याचा खर्च (जेवण आणि वैयक्तीक खर्च)- १९,४६४ डॉलर्स
  • मेडिकल इन्शुरन्स – ८,२३२ डॉलर्स
  • हेल्थ फी – ८१३ डॉलर्स
  • एकूण वार्षिक खर्च – १,३५,७७१ डॉलर्स
या प्रकारे जर एखाद्या विद्यार्थ्याला स्टॅनफर्डमधून एमबीए करायचे असेल तर त्याला एका वर्षासाठी १,३५,७७१ डॉलर्स (सुमारे १.२८ कोटी रुपये) डॉलर्स खर्च करावे लागतील. दोन वर्षाच्या एमबीएचा खर्च सुमारे २,७२,००० डॉलर्स (सुमारे २.५६ कोटी रुपये) इतका होतो. हा खर्च विद्यार्थ्यांच्या  जीवनशैलीनुसार कमी जास्त होऊ शकतो, कारण वैयक्तीक खर्च प्रत्येक विद्यार्थ्यांचा वेगवेगळा असतो.

Scholarship: परदेशी विद्यापीठात शिकायचंय पण खिशाचा विचार करताय? मग ‘या’ सरकारी शिष्यवृत्तीचा नक्की लाभ घ्या.

स्टॅनफर्डमध्ये एमबीए करण्याचे फायदे काय?

जरी येथील एमबीए महाग वाटत असले तरी येथून ग्रॅज्युएशन करण्याचे अनेक फायदे आहेत

पगार (Salary): येथील एमबीए ग्रॅज्युएट्सना सरासरी वार्षिक १,८५,००० डॉलर्स (सुमारे १.७४ कोटी रुपये) डॉलर पगार मिळतो. यामध्ये साइनिंग बोनस आणि इन्सेंटिव्हचा समावेश केल्यास हा आकडा अजून वाढतो.

रोजगार दर (Placement): येथील  ९० टक्के विद्यार्थ्यांना  पदवी पूर्ण झाल्यानंतर ३ महिन्यांच्या आत नोकरी मिळते यावरून मोठ्या कंपन्यामध्ये स्टॅनफर्ड ग्रॅज्यूएटची किती मागणी आहे हे कळते.

उद्योजकता (Entrepreneurship): स्टॅनफर्डचे विद्यार्थी केवळ नोकरी करत नाहीत तर उद्योजकतेमध्येही यशस्वी होतात येथील विद्यार्थी ३५० पेक्षा जास्त कंपन्या सुरू करतात

छोटा क्लास साईज: येथे दरवर्षी ४३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा उत्तम राहतो

थोडक्यात सांगायचे तर स्टॅनफर्डमधील एमबीएचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप चांगला आहे. विद्यार्थी केवळ २ वर्ष नोकरी करून शिक्षणाचा संपूर्ण खर्च वसूल करू शकतात. तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी येथे विविध शिष्यवृत्ती देखील उपलब्ध आहे.

Mars Cat Face Photo: अंतराळात ‘कार्टून कॅट’चा चेहरा! नासाने टिपलेल्या फोटोमागचे रहस्य नेमके काय ?

Web Title: Cost of education in stanford mba fees salary placements benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • America
  • education

संबंधित बातम्या

पुणे फक्‍त ‘फार्मसी एज्युकेशन हब’ नाहीतर आता ‘pharma innovation hub’ बनण्याची गरज; फार्मसी क्षेत्रापुढील मोठे आव्हान!
1

पुणे फक्‍त ‘फार्मसी एज्युकेशन हब’ नाहीतर आता ‘pharma innovation hub’ बनण्याची गरज; फार्मसी क्षेत्रापुढील मोठे आव्हान!

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!
2

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!
3

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
4

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.