फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Mars Cat Face Photo: ब्रम्हांड हे रहस्यांनी भरलेले आहे पण यावेळी जे चित्र समोर आले आहे. त्यामुळे इंटरनेटवर मीम्सचा पूर आला आहे. नासाच्या एका उपग्रहाने टिपलेल्या एका फोटोनुसार मंगळ ग्रहावर (Mars) एखादे खेळणे किंवा मांजरीचा चेहरा लपलेला दिसला. मग आता प्रश्न हा आहे ? की, खरचं मंगळावर मांजरी राहतात का? चला तर मग जाणून घेऊया या रोमांचक आणि रहस्यमयी फोटोमागचे सत्य ……..
शास्त्रज्ञांना मंगळ ग्रहावर धुळीने माखलेल्या पृष्ठभागावर एक असे चित्र दिसले आहे की, ज्यामध्ये दोन लहान डोळे, एक गोल नाक आणि हसणारे तोंड स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. हे पाहताना एखाद्या मांजरीच्या चेहऱ्यासारखे किंवा खेळण्यासारखे वाटते. हे दृश्य नासाच्या मार्स रिकोनिसेंस ऑर्बिटरने(MRO) टिपले, जेव्हा तो मंगळाच्या पृष्ठभागावरून सुमारे २५१ किमी उंचीवरून उडत होता. या डेटावर जेव्हा प्रक्रिया केली, तेव्हा त्यांनाही हसू आवरले नाही कारण ही हुबेहुब एखाद्या कार्टून कॅट सारखी दिसत होती.
शास्त्रज्ञांनी या आकृतीबद्दल सांगितले की, ही एक प्राचीन टेकडी आहे, जी काळच्या ओघात तुटून आकारलेली आहे. अंतराळातील धूळ आणि खडक विशिष्ट पद्धतीने साचल्याने हा चेहरा तयार झाला आहे. विज्ञानाच्या या भ्रमाला पॅरीडोलिया (Pareidolia) म्हणतात. ही आपल्या मेंदूची अशी सवय आहे, ज्यामुळे आपण ढग, डोंगर किंवा अनोळखी गोष्टींमध्येही मानवी चेहरे किंवा प्राण्यांच्या आकृत्या शोधू लागतो.
या रहस्यमयी आकृतीमागे कोणतीही जादू नसून भूगोल आहे. शास्त्रज्ञांच्या मते, चेहऱ्याच्या मध्यभागी जे नाकासारखे दिसते आहे, ती प्रत्यक्षात v आकाराची टेकडी आहे. डोळ्याचा विचार केला तर दोन खड्डे आहेत, जे योग्य अंतरावर स्थित आहेत. चेहऱ्याभोवती दिसणारे गोल जमिनीला पडलेल्या नैसर्गिक भेगांमुळे तयार झाले आहे. जेव्हा या तिन्ही गोष्टी अंतराळातून एकदमच पाहिल्या तर त्यांचा आकार एका हसऱ्या मांजरीसारखा दिसू लागला जो पूर्ण योगायोग आहे.
Power Nap in Schools : शाळेत झोपायला परवानगी? पाहा कोणत्या देशामध्ये आहे हा अजब नियम!






