फोटो सौजन्य - Social Media
सीएसआयआर – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (CSIR-NCL), पुणे यांनी कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Junior Secretariat Assistant – JSA) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, याबाबतची अधिकृत अधिसूचना जाहिरात क्र. NCL/01-2025/ADMIN-JSA अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती गट-क (Group-C) अराजपत्रित पदांसाठी आहे. शैक्षणिक अर्हता म्हणून उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा, तसेच संगणक टायपिंगचे कौशल्य आवश्यक आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 7 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून, 5 मे 2025 रोजी संध्याकाळी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीमध्ये एकूण १८ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये JSA (General) पदासाठी ११ जागा उपलब्ध आहेत. तसेच JSA (Stores & Purchase) साठी ४ जागा आणि JSA (Finance & Accounts) साठी ३ पदे रिक्त आहेत. सर्व पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता म्हणून 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा बाबत सांगायचे झाल्यास, उमेदवाराचे वय 5 मे 2025 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिक दुर्बल घटक (EWS), दिव्यांग (PwD) आणि माजी सैनिक (Ex-Servicemen) यांना सवलतीचा लाभ मिळू शकतो.
उमेदवारांची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे – प्रथम टप्पा लेखी परीक्षा (OMR आधारित किंवा संगणकावर घेतली जाणारी बहुपर्यायी स्वरूपाची), दुसरा टप्पा संगणक टायपिंग चाचणी आणि शेवटी कागदपत्रांची पडताळणी होईल. टायपिंग चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जाईल.
या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार recruit.ncl.res.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतात. अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती भरून, ओळखपत्रे, फोटो आणि सिग्नेचर अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट काढून भविष्यातील उपयोगासाठी ठेवावी. अर्ज सादर करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.