Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात मराठी विद्यार्थ्यांचं काय होणार? काय आहे शिक्षण विभागाचं निर्णय?

महाराष्ट्रात मराठी विद्यार्थ्यांसाठी तृतीय भाषा सक्ती वाद सुरु असताना शिक्षण विभागाने तृतीय भाषा का? याचे कारण स्पष्ट केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 19, 2025 | 02:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही महिन्यांपासून हिंदी भाषा सक्ती हा विषय राज्यात फार धरून ठेवला जात आहे. या विषयावरून राजकीय क्षेत्रातही फार मोठी चर्चा सुरु आहे. शासनाने आधी हिंदी भाषा सक्ती केल्यामुळे मराठी संघटनांनी प्रखर विरोध केला होता. “महाराष्ट्रात हिंदीची गरज काय? जर परप्रांतीय लोंढे येथे कमवण्यासाठी येतात, तर त्यांना आपली भाषा शिकण्यास लावा. आपल्यालाच त्यांची भाषा शिकण्याची काय गरज?” असे अनेक प्रश्न मांडण्यात आले होते. या विरोधामुळे सरकारला त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला. अशामध्ये नुकतेच सरकारने या निर्णयात बदल केला आहे. यामध्ये हिंदी भाषेची सक्ती हटवण्यात आली आहे.

डॉ. श्याम सुंदर पाठक यांचा प्रेरणादायी प्रवास! शिक्षक, ज्योतिषाचार्य ते पीसीएस अधिकारी…

पण पहिली ते पाचवी वर्गांना हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून शिकणे अनिवार्य आहे. पण २० विद्याथ्यांच्या समंतीनुसार तृतीय भाषेत बदल करता येऊ शकतो. एकंदरीत, २० विद्यार्थी आहेत त्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी नसून गुजराती या भाषेचा अभ्यास करायचा आहे तर त्यांना त्यासाठी मुभा देण्यात आली आहे. पण जर २० विद्यार्थ्यांची समंती मिळवण्यास असमर्थ ठरल्यास, तृतीय भाषा म्हणून हिंदी सक्ती होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, शासनाने तृतीय भाषा असणे का महत्वाचे आहे? याचे उत्तर स्पष्ट केले आहे. शिक्षण विभागाचे म्हणणे आहे की “भविष्यात संपूर्ण देशात अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट राबवण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्याला विषयांची संख्या आणि त्यासाठी दिलेला वेळ यावरून गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे जर तृतीय भाषा वगळली तर त्या विषयाचे क्रेडिट पॉईंट्स मिळवण्यात विद्यार्थी अपयशी ठरतील.” मराठी माध्यमाची मुलं मागे पडू नये म्हणून तृतीय भाषा सक्ती करण्यात आले असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.

‘अपयश ते IPS अधिकारी’ आकाश कुल्हारी यांचा प्रेरणादायी प्रवास!

“देशात असे अनेक राज्य आहेत, जेथे पहिली ते पाचवी वर्गांमध्ये तृतीय भाषा हा प्रकारच नाही. तर अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट हे संपूर्ण देशभरात लागू होत असल्याने अशा राज्यांमध्येही तृतीय भाषा सक्ती होईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Decision of the education department of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • dada bhuse
  • education news

संबंधित बातम्या

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया
1

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया

शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश! आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञान येणार शिकता
2

शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश! आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञान येणार शिकता

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा
3

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा

शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्रे लवकरच मिळणार; SCERT पुणेकडून वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांसाठी आदेश जारी
4

शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्रे लवकरच मिळणार; SCERT पुणेकडून वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांसाठी आदेश जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.