Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NDA vs NA: NDA आणि NA मध्ये नेमका काय फरक आहे? सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ही माहिती नक्की वाचा!

NDA vs NA: संघ लोक सेवा आयोगाच्या (UPSC) 'NDA & NA' परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी एनडीए आणि नेवल अकादमी (NA) मधील पात्रता, शिक्षण आणि प्रशिक्षणातील मुख्य फरक जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 16, 2026 | 04:34 PM
nda vs na

nda vs na

Follow Us
Follow Us:

NDA vs NA:  १२ वी मध्ये शिकत असताना किंवा पास झाल्यानंतर देशातील लाखो तरुण भारतीय सैन्यात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. जेव्हा जेव्हा संरक्षण दलांमध्ये अधिकारी बनण्याची गोष्ट येते, तेव्हा NDA आणि NA हे शब्द सर्वात जास्त ऐकायला मिळतात. संघ लोक सेवा आयोग याचा फॉर्म देखील सहसा एकत्रच काढतो, ज्याला ‘NDA & NA Exam’ म्हटले जाते. याच कारणामुळे बहुतांश विद्यार्थी आणि पालक असे गृहीत धरतात की हे दोन्ही एकाच गोष्टीची दोन नावे आहेत, पण प्रत्यक्षात असे अजिबात नाही.

जर तुम्ही सैन्याचा गणवेश परिधान करण्याचे स्वप्न पाहत असाल तर फॉर्म भरण्यापूर्वी एनडीए (NDA) आणि एनए (NA) मधील फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. एनडीए आणि एनएच्या माध्यमातून तुम्ही जरी भारतीय सशस्त्र दलात क्लास-१ अधिकारी बनत असलात, तरी त्यांच्या प्रशिक्षणाची पद्धत, अभ्यासाचा पॅटर्न, निवडीचे नियम आणि अगदी प्रशिक्षणाचे ठिकाणसुद्धा एकदम वेगळे असते. एनडीए आणि एनए मधील मुख्य अंतर काय आहे आणि तुमच्या करिअरसाठी कोणता मार्ग सर्वात उत्तम ठरेल, ते आज आपण जाणून घेणार आहोत.

NDA आणि NA मध्ये काय फरक आहे?

NDA (नॅशनल डिफेन्स अकादमी) ही त्रि-सेवा अकादमी आहे. याचा अर्थ असा की येथे लष्कर, नौदल आणि हवादल, तिन्हीसाठी कॅडेट्स तयार केले जातात. परीक्षा पास झाल्यानंतर पसंती आणि गुणवत्तेच्या (मेरिट) आधारावर तिन्हीपैकी कोणतीही एक विंग मिळते. दुसरीकडे, NA (नेवल अकादमी) विशेषतः फक्त भारतीय नौदलासाठी आहे. जर तुम्ही NA चा पर्याय निवडला तर तुमची निवड केवळ आणि केवळ नेवीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रँचसाठी होईल. यामध्ये आर्मी किंवा एअरफोर्समध्ये जाण्याची संधी मिळत नाही.

World Largest State: जगातले सर्वात मोठे राज्य कोणते? भारताएवढे क्षेत्रफळ पण लोकसंख्या का एवढी कमी? जाणून घ्या

दोन्हीच्या नियमांमध्ये फरक

NDA साठी: १२ वी मध्ये आर्ट्स किंवा कॉमर्समधून शिक्षण घेतलेले विद्यार्थीही NDA चा फॉर्म भरू शकतात. तथापि, तेव्हा तुम्ही केवळ भारतीय लष्करासाठी पात्र असाल. नेवी आणि एअरफोर्ससाठी १२ वी मध्ये फिजिक्स आणि मॅथ्स असणे आवश्यक आहे.

NA साठी: NA मध्ये जाण्यासाठी १२ वी मध्ये फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स (PCM) अनिवार्य आहे.

शिक्षण आणि डिग्रीचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा

NDA (खडकवासला, पुणे): येथे कॅडेट्स ३ वर्षे अभ्यास आणि मूलभूत लष्करी प्रशिक्षण घेतात. अभ्यास पूर्ण झाल्यावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून बीए, बीएससी किंवा बीटेकची डिग्री मिळते. यानंतर १ वर्षाच्या प्रगत प्रशिक्षणासाठी संबंधित विंगच्या अकादमीत पाठवले जाते.

NA (एझिमाला, केरळ): नेवल अकादमीमध्ये कॅडेट्स थेट ४ वर्षांचे बीटेकचे शिक्षण घेतात. येथे नौदल प्रशिक्षणासोबतच इंजिनिअरिंगच्या डिग्रीवर भर दिला जातो.

Meta salary: IIT च्या विद्यार्थ्याला चक्क ८०० कोटींचे पॅकेज! कोण आहेत त्रपित बंसल, ज्यांना मेटाने केले आपल्या टीममध्ये दाखल?

एनडीए किंवा एनए, कोणता मार्ग योग्य आहे?

जर तुमचे स्वप्न लष्कर, हवादल किंवा नौदलात सामील होण्याचे असेल आणि तुम्हाला तिन्ही सैन्यांच्या कॅडेट्ससोबत ३ वर्षे प्रशिक्षणाचा अनुभव घ्यायचा असेल तर NDA (नॅशनल डिफेन्स अकादमी) ही पहिली पसंती असायला हवी. पण जर तुमचा फोकस फक्त समुद्राच्या लाटांवर आणि भारतीय नौदलावर असेल आणि तुम्ही टेक-माइंडेड असाल तर १२ वी नंतर NA हा सर्वात अचूक आणि सरळ मार्ग आहे.

Web Title: Difference between nda vs na upsc marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Defence Sector
  • education
  • UPSC

संबंधित बातम्या

UPSC Success Story: वयाच्या २२ व्या वर्षी कशी क्रॅक केली यूपीएससी परीक्षा? जाणून घ्या आयएएस अनन्या सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास!
1

UPSC Success Story: वयाच्या २२ व्या वर्षी कशी क्रॅक केली यूपीएससी परीक्षा? जाणून घ्या आयएएस अनन्या सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास!

Resume tips: रेझ्युमेवर फोटो लावावा की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला!
2

Resume tips: रेझ्युमेवर फोटो लावावा की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला!

Higher Education Growth:  १९४७ ते २०२६ पर्यंत भारतात किती विद्यापीठांची, आयआयटीची संख्या वाढली? जाणून घ्या..
3

Higher Education Growth: १९४७ ते २०२६ पर्यंत भारतात किती विद्यापीठांची, आयआयटीची संख्या वाढली? जाणून घ्या..

Study in Australia: १२ वी नंतर ऑस्ट्रेलियात हवी आहे त्वरित नोकरी? ‘हा’ शॉर्ट टर्म कोर्स ठरू शकतो गेमचेंजर!
4

Study in Australia: १२ वी नंतर ऑस्ट्रेलियात हवी आहे त्वरित नोकरी? ‘हा’ शॉर्ट टर्म कोर्स ठरू शकतो गेमचेंजर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.