Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पर्धा परीक्षांच्या २०० पुस्तकांचे वाटप! पोलिस अधिकारी पाटील यांचा पुढाकार

खामगावमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी २०० पुस्तकांचे मोफत वाटप केले. हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “वाचून मोठे होऊया” या संकल्पनेतून राबवण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 16, 2026 | 11:21 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

खामगाव, ब्यूरो : “वाचाल तर वाचाल” हा संदेश B. R. Ambedkar यांनी दिला असून, त्याचे महत्त्व आजच्या तरुण पिढीसाठी अधिक अधोरेखित होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ या संकल्पनेतून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०० पुस्तकांचे मोफत वाटप केले. सुमारे २८ हजार रुपयांच्या या पुस्तकांचे वितरण भीमजयंतीच्या पूर्वसंध्येला करण्यात आले.

CBSE RESULT : मनपा शाळांचा उल्लेखनीय यश! आर्या लामने आली प्रथम; ‘या’ विद्यार्थ्यांनी मारली बाजी

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, कोचिंग आणि अभ्यासासाठी आवश्यक संदर्भ पुस्तके सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थी केवळ संसाधनांच्या अभावामुळे मागे राहतात. ही बाब लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात मोठे साधन असून, शिक्षणामुळेच माणसाचा सर्वांगीण विकास आणि प्रगती शक्य होते.

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून “उत्सव फक्त साजरा न करता त्यातून समाजाला दिशा मिळावी” हा संदेश देण्यात आला. ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ ही संकल्पना पुढे नेत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी आणि स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने पाहिले जावे, असा प्रयत्न या उपक्रमामागे आहे.

सध्याच्या काळात स्पर्धा परीक्षा हेच शासकीय नोकरी मिळवण्याचे प्रमुख माध्यम बनले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य, शिस्त आणि चिकाटी ठेवणे अत्यावश्यक आहे, असे प्रदीप पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही कठोर परिश्रम आणि योग्य दिशा मिळाल्यास तेही मोठे यश मिळवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमांतर्गत ‘सिंबॉल ऑफ नॉलेज’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, तालुका क्रीडा संकुल तसेच तांदुळवाडी, नांदरी आणि वझर या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात आली. या कार्यक्रमाला संचालक संजय गवई, प्रशांत खरात, सामाजिक कार्यकर्ते नितीन सूर्यवंशी तसेच पोलीस विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भारतात ‘या’ Job चा बोलबाला! Linkdn चं संशोधन काय म्हणतं? ‘हे’ दोन पर्याय सगळ्यात उत्तम

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या काळात माहितीचा महासागर उपलब्ध आहे, पण योग्य दिशादर्शन आणि वाचनाची सवय नसल्यास त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे पुस्तके हेच खरे मार्गदर्शक आहेत. शेवटी, या उपक्रमातून “वाचन हीच खरी शक्ती आहे” हा संदेश ठळकपणे देण्यात आला. केवळ उत्सव, मिरवणुका किंवा औपचारिक कार्यक्रमांपुरते न थांबता शिक्षण आणि ज्ञानवाटपातूनच डॉ. आंबेडकरांना खरी आदरांजली अर्पण होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

Web Title: Distribution of 200 books for competitive exams an initiative by police officer patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

केवळ इंजिनिअरिंग नव्हे; ऑटोमोबाईल क्षेत्रात कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनाही मोठा वाव
1

केवळ इंजिनिअरिंग नव्हे; ऑटोमोबाईल क्षेत्रात कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनाही मोठा वाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.