Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NTA Duplicate Scorecard: स्कोरकार्ड हरवण्याची चिंता संपली! अर्ज करण्यापूर्वी ‘हे’ तपासा; NTA चा नवा नियम जाहीर

NTA Duplicate Scorecard Update : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) डुप्लिकेट स्कोरकार्ड जारी करण्याच्या नियमात बदल केला असून, आता ते केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ईमेलद्वारे पाठवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार असून, अर्ज करण्यापूर्वी डिजिलॉकर तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 21, 2026 | 04:03 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • NTA च्या नवीन नियमानुसार डुप्लिकेट स्कोरकार्ड कसे मिळेल?
  • भारत सरकारचे विश्वासार्ह डिजिटल प्लॅटफॉर्म- डिजिलॉकर 
  • विद्यार्थ्यांना काय फायदा होईल?
NTA Duplicate Scorecard Update: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) ही अपडेट लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची असणार आहे. एनटीएने आता कागदपत्रांची प्रक्रिया अधिक सोपी केली  आहे. कौन्सिलिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा मुलाखतीसाठी स्कोरकार्डची गरज असते. मात्र अनेकदा विद्यार्थ्यांकडून प्रिंटआउट हरवते किंवा खराब होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कोणत्याही काम अडथळा येऊ नये, यासाठी डुप्लिकेट स्कोरकार्ड जारी करण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे.

नुकत्याच जारी करण्यात आलेल्या कोरिजेन्डमनुसार, आता ड्युप्लिकेट स्कोरकार्ड केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी केले जातील. एनटीएने स्पष्ट केले आहे की, हे स्कोरकार्ड ईमेलद्वारे पाठवले जाईल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ‘डिजिलॉकर’ तपासण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता अतिरिक्त शुल्क भरण्याची  गरज भासणार नाही.

भारत सरकारचे विश्वासार्ह डिजिटल प्लॅटफॉर्म- डिजिलॉकर

डिजिलॉकर हे भारत सरकारचे विश्वासार्ह डिजिटल प्लॅटफॉर्म असून तिथे जारी केलेल्या कागदपत्रांना डिजिटल स्वरूपात कायदेशीर मान्यता असते. त्यामुळे ड्युप्लिकेट स्कोरकार्ड प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी डिजिलॉकर खात्यात लॉग इन करून तपासावे. तिथे उपलब्ध असल्यास ते डाउनलोड करावे. यामुळे विद्यार्थ्यांची धावपळही होणार नाही.

एनटीएने कोणत्याही माहितीसाठी आणि अपडेटसाठी  nta.ac.in वर भेट देण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय result@nta.gov.inवर ईमेलही करता येईल. 011-40759000 आणि 1800-180-4747 या हेल्पलाइन क्रमांकावरही मदत घेता येईल. प्रत्यक्ष प्रतीसाठी 200 रुपये भरण्याची गरजही पडणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर

विद्यार्थ्यांना काय फायदा होईल?

बहुतांश महाविद्यालये, विद्यापीठे आणि भरती संस्था ऑनलाईन व्हेरिफिकेशन किंवा डिजिटल प्रत स्वीकारतात. तसेच ते हरवण्याची आणि भिजण्याची भीती राहत नाही. ईमेल आणि डिजिलॉकरद्वारे डिजिटल स्कोरकार्ड मिळाल्याने वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत होईल. मात्र कोणत्याही परीक्षेचा स्कोरकार्ड आल्यानंतर त्याची पीडीएफ ईमेल ड्राफ्ट, गुगल ड्राइव्ह किंवा डिजिलॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्याची सवय नक्की असावी. यामुळे अर्ज भरताना ताण येणार नाही.

Aeronautical Engineering Career: आकाशात झेप घेण्याची संधी! बारावीनंतर कसे बनावे एयरोनॉटिकल इंजिनिअर? जाणून घ्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: NTA च्या नवीन नियमानुसार डुप्लिकेट स्कोरकार्ड कसे मिळेल?

    Ans: नवीन नियमानुसार डुप्लिकेट स्कोरकार्डची कागदी प्रत मिळणार नसून, ते केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ईमेलद्वारे पाठवले जाईल; तसेच त्यासाठी पूर्वी आकारले जाणारे २०० रुपये शुल्कही भरावे लागणार नाही.

  • Que: डुप्लिकेट स्कोरकार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काय तपासावे?

    Ans: अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी उमेदवारांनी डिजिलॉकर (DigiLocker) खात्यात लॉग इन करून स्कोरकार्ड उपलब्ध आहे का ते तपासावे; तिथे असल्यास तेथूनच डाउनलोड करता येते.

  • Que: NTA शी संपर्क साधण्यासाठी कोणती वेबसाइट आणि हेल्पलाइन उपलब्ध आहे?

    Ans: अधिक माहिती व अपडेटसाठी nta.ac.in वर भेट देता येईल, तर result@nta.gov.in या ईमेलवर तसेच 011-40759000 आणि 1800-180-4747 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येतो.

Web Title: Nta duplicate scorecard digilocker email rule change 200 fee waived marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Career
  • education
  • National Testing Agency

संबंधित बातम्या

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर
1

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर

Aeronautical Engineering Career: आकाशात झेप घेण्याची संधी! बारावीनंतर कसे बनावे एयरोनॉटिकल इंजिनिअर? जाणून घ्या
2

Aeronautical Engineering Career: आकाशात झेप घेण्याची संधी! बारावीनंतर कसे बनावे एयरोनॉटिकल इंजिनिअर? जाणून घ्या

SSC Recruitment 2026: SSC मध्ये ‘या’ पदांवर विभागीय भरती; कशी असेल निवड प्रक्रिया आणि अर्जाची मुदत?
3

SSC Recruitment 2026: SSC मध्ये ‘या’ पदांवर विभागीय भरती; कशी असेल निवड प्रक्रिया आणि अर्जाची मुदत?

India First Deeptech U-Hub: देशातील पहिला डीपटेक यू-हब उभारला जाणार ‘या’ शहरात; सरकारने मंजूर केला २८१ कोटींचा निधी
4

India First Deeptech U-Hub: देशातील पहिला डीपटेक यू-हब उभारला जाणार ‘या’ शहरात; सरकारने मंजूर केला २८१ कोटींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.