Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Bonus Rules 2026: दिवाळीला बोनस मिळणार की नाही? कर्मचाऱ्यांनी जाणून घ्या नियम आणि पात्रता

Diwali Bonus Rules 2026: दिवाळीच्या काळात कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो; मात्र प्रत्येक प्रकारचा बोनस देणे बंधनकारक नसते. सणाचा बोनस हा कंपनीच्या इच्छेवर अवलंबून असतो, तर कायदेशीर वार्षिक बोनस पात्र कर्मचाऱ्यांना नियमानुसार द्यावा लागतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 16, 2026 | 11:20 AM
Diwali Bonus Rules 2026 (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Diwali Bonus Rules 2026 (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

दिवाळी आली की नोकरी करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, यंदा बोनस मिळणार का? वर्षभर काम केल्यावर पगाराव्यतिरिक्त थोडे जास्त पैसे मिळाले तर दिवाळी अजून गोड होते. काही कंपन्या रोख पैसे देतात, काही गिफ्ट देतात, काही मिठाई देतात. पण अनेकांना वाटते की दिवाळीला बोनस देणे कंपनीला सक्तीचे आहे. खरच तसे आहे का? चला सोप्या भाषेत समजून घेऊ. Diwali Bonus Rules 2026:

दोन प्रकारचे बोनस असतात

सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की बोनसचे दोन प्रकार असतात. एक असतो सणाचा बोनस आणि दुसरा असतो कायद्याने मिळणारा बोनस.

दिवाळीला जो बोनस मिळतो त्याला फेस्टिवल बोनस म्हणतात. हा कंपनीच्या मनावर असतो. कंपनीला वाटले तर देईल, नाही वाटले तर नाही देणार. यासाठी तुम्ही कंपनीला जबरदस्ती करू शकत नाही. हा कायदेशीर हक्क नाही. कंपनीचा नफा झाला असेल, कंपनीची परिस्थिती चांगली असेल तर मालक खुश होऊन देतो.

पण दुसरा जो बोनस आहे तो कायद्याचा बोनस आहे. याला वार्षिक बोनस म्हणतात. हा पूर्वी Payment of Bonus Act 1965 नुसार मिळायचा, आता तो Code on Wages 2019 मध्ये आला आहे. त्याच्या कलम 26 ते 41 मध्ये याचे सगळे नियम लिहिले आहेत. हा बोनस कंपनीला द्यावाच लागतो.

कायद्याचा बोनस कसा मोजतात?

कायद्यानुसार कंपनीला कमीत कमी 8.33% आणि जास्तीत जास्त 20% पर्यंत बोनस द्यावा लागतो. पण हा तुमच्या पूर्ण पगारावर नाही मोजत.

सरकारने यासाठी एक लिमिट ठेवली आहे. समजा तुमचा पगार 50,000 आहे, पण बोनस मोजण्यासाठी सरकारने 7,000 रुपये किंवा त्या राज्याचे किमान वेतन ही मर्यादा ठेवली आहे. त्यावरच 8.33% मोजला जाईल. म्हणजे पगार जास्त असला तरी बोनस त्याच लिमिटवर मिळतो.

हा नियम सगळ्याच कंपन्यांना नाही. ज्या कंपनीत 20 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करतात त्यांनाच हा कायदा लागू होतो. 10 लोक असलेल्या छोट्या दुकानाला हा नियम लागू होत नाही. तसेच तुमचा पगार एका ठराविक मर्यादेत असला तरच तुम्ही पात्र ठरता.

बोनसवर टॅक्स लागतो का?

अनेकांना वाटते बोनसवर टॅक्स नाही लागत. पण हे चुकीचे आहे. कंपनीने दिलेला बोनस हा तुमच्या पगाराचाच भाग समजला जातो. तो तुमच्या वर्षाच्या एकूण उत्पन्नात जोडला जातो आणि मग तुमचा जो टॅक्स स्लॅब असेल त्यानुसार टॅक्स लागतो. म्हणजे बोनस पूर्णपणे करमुक्त नाही.

जर कंपनीने बोनस नाही दिला तर काय करायचे?

तुम्ही जर सगळ्या अटींमध्ये बसत असाल, 20 पेक्षा जास्त लोक असलेल्या कंपनीत काम करत असाल, तरी पण कंपनी बोनस देत नसेल तर घाबरू नका. तुम्ही काही गोष्टी करू शकता.

पहिले तुमचे अपॉइंटमेंट लेटर नीट वाचा. त्यात बोनसबद्दल काय लिहिले आहे ते बघा. तुमच्या सॅलरी स्लिप सांभाळून ठेवा.नंतर HR कडे किंवा बॉसकडे लेखी विचारा की बोनस का दिला नाही. तोंडी नको, ईमेल किंवा पत्राने विचारा.तरी पण उत्तर नाही मिळाले तर तुम्ही थेट कामगार कार्यालयात जाऊ शकता. तुमच्या भागातील उप कामगार आयुक्ताकडे तक्रार करू शकता. किंवा कामगार न्यायालयात केस पण टाकू शकता.

लक्षात ठेवा, दिवाळीचा गिफ्ट वाला बोनस हा कंपनीच्या इच्छेवर आहे, पण कायद्याने मिळणारा वार्षिक बोनस हा तुमचा हक्क आहे. त्यामुळे आपले कागदपत्रे जपून ठेवा आणि आपल्या हक्कांबद्दल जागरूक रहा. दिवाळीच्या गोडव्यासोबत आपला हक्क पण माहिती असायला हवा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीचा बोनस देणे कंपन्यांना बंधनकारक आहे का?

    Ans: सणाचा बोनस ऐच्छिक असतो; कायदेशीर वार्षिक बोनस पात्र कर्मचाऱ्यांना नियमानुसार द्यावा लागतो.

  • Que: कायदेशीर बोनस किती मिळतो?

    Ans: बातमीनुसार, बोनसचा दर किमान ८.३३% आणि कमाल २०% असतो.

  • Que: बोनसवर कर लागतो का?

    Ans: होय, बोनस वार्षिक उत्पन्नात जोडला जातो आणि लागू करदरानुसार त्यावर कर लागू शकतो.

Web Title: Diwali bonus rules 2026 eligibility calculation tax rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Diwali 2026

संबंधित बातम्या

Bombay High Court : मुंबईत दिवाळीला फटाक्यांवर बंदी? डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सबाबतही उच्च न्यायालयाचे दिले महत्वाचे निर्देश
1

Bombay High Court : मुंबईत दिवाळीला फटाक्यांवर बंदी? डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सबाबतही उच्च न्यायालयाचे दिले महत्वाचे निर्देश

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक
2

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक

6 Best boAt Aavante Soundbars: दिवाळीत घर बनेल मिनी थिएटर! ‘हे’ 6 दमदार Soundbar वाढवतील मनोरंजनाचा आवाज
3

6 Best boAt Aavante Soundbars: दिवाळीत घर बनेल मिनी थिएटर! ‘हे’ 6 दमदार Soundbar वाढवतील मनोरंजनाचा आवाज

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…
4

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.