Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक

Samsung Diwali Offers 2026: सॅमसंग इंडियाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘बिग, बिगर, बिगेस्ट’ मोहीम जाहीर केली असून, निवडक व्हिजन एआय टीव्हींच्या खरेदीवर १.५९ लाख रुपयांपर्यंत मोफत टीव्ही किंवा १.१० लाख रुपयांपर्यंत मोफत साउंडबार देण्याची ऑफर जाहीर केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 15, 2026 | 05:44 PM
Samsung Diwali Offers 2026

Samsung Diwali Offers 2026

Follow Us
Follow Us:
  • दिवाळी शॉपिंग करणाऱ्यांसाठी खुशखबर
  • Samsung TV खरेदीची सुवर्णसंधी
  • कॅशबॅकपासून मोफत टीव्हीपर्यंत फायदे
मुंबई: सॅमसंग इंडियाने आज ‘बिग, बिगर, बिगेस्ट’ मोहिमेची घोषणा केली, ज्यासह ग्राहकांना यंदा सणासुदीच्या काळात व्हिजन एआय-सक्षम मोठ्या स्क्रिन आकाराच्या टीव्हींच्या श्रेणीवर आकर्षक ऑफर्सचा आनंद घेता येईल. सण-उत्सवाचा उत्साह, कौटुंबिक मेळावे आणि एकत्र घालवलेल्या संध्याकाळच्या संकल्पनेवर आधारित ही मोहीम ग्राहकांना अधिक उत्साहवर्धक अनुभव घेण्यासाठी सॅमसंगच्या अत्याधुनिक एआय-सक्षम टेलिव्हिजनवर अपग्रेड करणे अधिक सुलभ बनवते.

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात

या फेस्टिव्ह ऑफर्सचा भाग म्हणून निवडक सॅमसंग टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १,१०,९९० रुपयांपर्यंत मोफत सॅमसंग साउंडबार किंवा १,५९,९९० रुपयांपर्यंत मोफत सॅमसंग व्हिजन एआय टीव्ही मिळू शकतो. या ऑफरमध्ये २० टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक, झिरो डाऊन पेमेंटचे पर्याय आणि ३ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी यांचाही समावेश आहे, ज्यामुळे ग्राहकांना या सणासुदीच्या काळात त्यांचा घरातील मनोरंजनाचा अनुभव अपग्रेड करणे अधिक सुलभ होते. लागू अटी व शर्तींच्या अधीन राहून महानगरपालिका हद्दीतील पात्र सॅमसंग व्हिजन एआय टेलिव्हिजन खरेदी करणारे ग्राहक विनंती नोंदवल्यापासून चार तासांच्या आत त्यांची सॅमसंग उत्पादने इन्स्टॉल करून घेऊ शकतात.

“कुटुंबे आणि मित्रमंडळी एकत्र येऊन दिवाळी सण साजरा करतात, एकत्र उत्साहवर्धक क्षणांचा आनंद घेतात आणि कायमस्वरूपी आठवणी निर्माण करतात. आमच्या व्हिजन एआय-सक्षम मोठ्या स्क्रिन आकाराच्या टीव्हींच्या माध्यमातून सॅमसंग ग्राहकांसाठी अधिक मोठा, स्मार्ट आणि उत्साहवर्धक होम एंटरटेनमेंट अनुभव घेऊन येत आहे. आकर्षक फेस्टिव्ह ऑफर्स, लवचिक पेमेंट पर्याय, कॅशबॅक आणि मूल्यवर्धित सेवांसह आम्ही कुटुंबांसाठी मोठ्या स्क्रिन आकाराचा टीव्ही घरी आणणे आणि या सणासुदीत अधिक समृद्ध मनोरंजनाचा आनंद घेणे अधिक सुलभ करत आहोत,” असे सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे व्हाइस प्रेसिडेंट विप्लेश डांग म्हणाले.

सॅमसंगचे व्हिजन एआय-सक्षम टीव्ही मोठ्या स्क्रिनवर प्रगत आणि स्मार्ट वैशिष्ट्ये आणतात, ज्यामुळे पिक्चर आणि साऊंडचा दर्जा उंचावण्यास मदत होते, तसेच अधिक वैयक्तिकृत व्ह्यूइंग अनुभव मिळतो. ग्राहक आपले आवडते शोज, चित्रपट, खेळ किंवा सणासुदीचे कार्यक्रम कुटुंबीय आणि मित्रांसोबत पाहत असताना त्यांचा दैनंदिन मनोरंजनाचा अनुभव अधिक उत्साहवर्धक आणि खिळवून ठेवणारा बनवण्यासाठी ही श्रेणी डिझाइन करण्यात आली आहे.

३२ इंचापासून ११५ इंचापर्यंत विस्तृत लाइनअपसह सॅमसंग व्हिजन एआय टीव्ही ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करतात, ज्यामध्ये आकर्षक, जीवनशैलीशी सुसंगत स्लीक डिझाइन्स आणि उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टथिंग्स सोल्यूशन्सचा समावेश आहे. सॅमसंगचे ‘मेड फॉर इंडिया’ प्लस बेनिफिट्स (सॅमसंग टीव्ही प्लस, सॅमसंग केअर+, सॅमसंग आर्ट+, सॅमसंग साउंड+, सॅमसंग फायनान्स+ आणि ७ वर्षांचे ओएस अपग्रेड) टीव्ही मालकीचा प्रत्येक पैलू समृद्ध होईल याची खात्री देतात.

सॅमसंग टीव्ही प्लस २०० हून अधिक स्ट्रीमिंग चॅनेल्सचा मोफत अॅक्सेस देते, सॅमसंग साउंड+ इमर्सिव्ह साऊंड अनुभव प्रदान करते, सॅमसंग केअर+ वाढीव वॉरंटी देते आणि सॅमसंग फायनान्स+ द्वारे ग्राहकांना लवचिक, पेपरलेस फायनान्सिंग पर्याय मिळतात. सॅमसंग आर्ट+ सह ग्राहकांना सॅमसंग आर्ट स्टोअरचा ३ महिन्यांचा मोफत अॅक्सेस मिळतो, ज्यामुळे त्यांच्या घराचे रूपांतर वैयक्तिक आर्ट गॅलरीमध्ये होते. सॅमसंग व्हिजन एआय टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सात वर्षांपर्यंतच ओएस अपग्रेड्सचाही लाभ मिळतो, ज्यामुळे दीर्घकालीन मनोरंजन आणि समाधानाची खात्री मिळते.

6 Best boAt Aavante Soundbars: दिवाळीत घर बनेल मिनी थिएटर! ‘हे’ 6 दमदार Soundbar वाढवतील मनोरंजनाचा आवाज

Web Title: Samsung diwali offers 2026 free tv soundbar cashback pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • samsung
  • Samsung Sale
  • Tech News

संबंधित बातम्या

6 Best boAt Aavante Soundbars: दिवाळीत घर बनेल मिनी थिएटर! ‘हे’ 6 दमदार Soundbar वाढवतील मनोरंजनाचा आवाज
1

6 Best boAt Aavante Soundbars: दिवाळीत घर बनेल मिनी थिएटर! ‘हे’ 6 दमदार Soundbar वाढवतील मनोरंजनाचा आवाज

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात
2

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस
3

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…
4

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.