Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत ज्ञानेश्वरीचे प्रकाशन! मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रतिपादन, वांद्रयातील विठ्ठल मंदिरात आयोजन

मुंबईत ज्ञानेश्वरीच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हे प्रतिपादन करण्याचे योजिले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 19, 2025 | 12:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • अलंकारीत ज्ञानेश्वरी ही आधुनिक सादरीकरणासह पारंपरिक वारसा जोपासणारी ग्रंथरूपी भेट
  • मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या अलंकारीत आवृत्तीचे प्रकाशन
  • या ग्रंथाच्या देखण्या मांडणीचे आणि उपयुक्ततेचे विशेष कौतुक
अलंकारीत ज्ञानेश्वरीचे प्रकाशन सोहळा वांद्रे येथील विठ्ठल–रखुमाई मंदिरात अत्यंत भक्तीभावपूर्ण वातावरणात पार पडला. ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त न्यू एज मीडिया पार्टनर या जाहिरात संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेली अलंकारीत ज्ञानेश्वरी ही आधुनिक सादरीकरणासह पारंपरिक वारसा जोपासणारी ग्रंथरूपी भेट आहे. या सोहळ्यात सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या अलंकारीत आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी या ग्रंथाच्या देखण्या मांडणीचे आणि उपयुक्ततेचे विशेष कौतुक केले.

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

अशा प्रकारची आकर्षक आणि कलात्मक मांडणी आधुनिक पिढीला अध्यात्माच्या मार्गावर प्रेरित करणार असल्याचे ते म्हणाले. अलंकारीत ज्ञानेश्वरीचे अक्षर आकार मोठे असल्याने ज्येष्ठ नागरिकांनाही या ग्रंथाचे वाचन अधिक सुलभपणे करता येईल, हा या ग्रंथाचा मोठा फायदा असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यात्मिक ग्रंथांचे सादरीकरण आकर्षक आणि वाचकाभिमुख पद्धतीने झाले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मूल्यनिष्ठ विचार पोहोचू शकतात, अशी भावना शेलार यांनी व्यक्त केली.

ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेली ज्ञानेश्वरी ही मराठीतील सर्वात महत्त्वाची आणि दिव्य ग्रंथपरंपरा मानली जाते. “ही ज्ञानेश्वरी म्हणजे संपूर्ण मानवजातीला कवेत घेणारी जीवनमार्गदर्शक दिशा आहे. जीवात्म्यापासून परमात्म्यापर्यंतच्या प्रवासाचे सूक्ष्म, सखोल आणि तात्त्विक वर्णन करणारे हे अमृतवचन आहे,” असे मतही आशिष शेलार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. भक्ती, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांचा अनोखा संगम असलेल्या या ग्रंथाचा अलंकारीत आविष्कार नवी ऊर्जा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

न्यू एज मीडिया पार्टनर प्रा. लि. या जाहिरात संस्थेने आपल्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम हाती घेतला आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक जाणिवांना पोषक असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असल्याचे सांगत मंत्र्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. “व्यावसायिक संस्थांनी अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील मूल्यजतनाची जबाबदारी स्वीकारणे हा सकारात्मक संदेश आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

या प्रकाशन कार्यक्रमाला न्यू एज मीडिया पार्टनरचे संचालक प्रसाद कुलकर्णी, प्राची कुलकर्णी, अमित कबरे, महेश चव्हाण, संतोष किल्लेकर, मुकेश मोरे, प्रशांत कांगणे, चंद्रकांत जाधव, जसपाल जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही अलंकारीत ज्ञानेश्वरीच्या मांडणीचे आणि ग्रंथनिर्मितीमागील भावनेचे कौतुक केले. पारंपरिक आध्यात्मिक वारसा आधुनिक युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, अशीही भावना व्यक्त करण्यात आली.

उच्चशिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबईतील कार्यक्रमात निर्देश

विठ्ठल–रखुमाई मंदिरात झालेला हा प्रकाशन सोहळा भक्तिभाव, सांस्कृतिक उत्साह आणि अध्यात्मिक मूल्यांचा सुंदर संगम ठरला. अलंकारीत ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनातून नवी पिढी अध्यात्माशी जोडली जाण्याची आणि ज्येष्ठांना सुलभ वाचनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Dnyaneshwaris release in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Career

संबंधित बातम्या

JEE Main 2026 सेशन 1 परीक्षेची सिटी स्लिप लवकरच होणार जाहीर; कसे कराल डाउनलोड? जाणून घ्या
1

JEE Main 2026 सेशन 1 परीक्षेची सिटी स्लिप लवकरच होणार जाहीर; कसे कराल डाउनलोड? जाणून घ्या

BOI Vacancy: क्रेडिट ऑफिसरच्या 514 पदांसाठी अर्जाची आज शेवटची संधी; अनुभवी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
2

BOI Vacancy: क्रेडिट ऑफिसरच्या 514 पदांसाठी अर्जाची आज शेवटची संधी; अनुभवी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा
3

शिक्षक भरतीला शासनाची मंजुरी! पालिका व जि. प. शाळांना मोठा दिलासा

नोकरी… ते काय असतं? स्वातीने नाकारला जॉब आणि तीन महिन्यात दहा हजारांचे केले लाखो रुपये
4

नोकरी… ते काय असतं? स्वातीने नाकारला जॉब आणि तीन महिन्यात दहा हजारांचे केले लाखो रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.