फोटो सौजन्य - Social Media
बारावी आर्ट्स झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना पुढे कोणता कोर्स करावा याचा प्रश्न पडतो. पूर्वी बी.ए. किंवा एखाद्या विषयात ऑनर्स करणे हेच एकमेव पर्याय वाटत असत, पण आता काळ बदलला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आर्ट्स स्ट्रीमसाठीही अनेक करिअरपरक आणि क्रिएटिव्ह कोर्स उपलब्ध झाले आहेत. हे कोर्स केवळ तुमच्या कलात्मक आणि विश्लेषणात्मक क्षमतेला चालना देत नाहीत, तर नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण करतात.
सर्वप्रथम ‘बॅचलर ऑफ डिजिटल मार्केटिंग’ हा कोर्स आर्ट्स विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. यात SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग आणि डेटा अॅनालिटिक्स यासारखे विषय शिकवले जातात. IGNOU, DAV कॉलेज चंदीगड आणि सिम्बायोसिस पुणे येथे हा कोर्स उपलब्ध आहे. या कोर्सनंतर डिजिटल मार्केटर, SEO स्पेशालिस्ट, सोशल मीडिया मॅनेजर अशा नोकऱ्या मिळू शकतात आणि सुरुवातीला 3 ते 8 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.
दुसरा महत्त्वाचा कोर्स म्हणजे ‘बॅचलर ऑफ डिझाईन (UX/UI Design)’. हा कोर्स वेबसाइट्स आणि अॅप्सच्या यूजर एक्सपीरियन्सवर लक्ष केंद्रित करतो. MIT पुणे, NIFT दिल्ली येथे हा कोर्स शिकता येतो. या क्षेत्रात UX/UI डिझायनर, प्रॉडक्ट डिझायनर अशी पदे मिळतात आणि 5 ते 12 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.
तिसरा पर्याय आहे ‘बॅचलर ऑफ जर्नालिझम अॅन्ड मास कम्युनिकेशन (BJMC)’, ज्यामध्ये डिजिटल मीडिया आणि कंटेंट क्रिएशनवर भर दिला जातो. माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि क्राइस्ट युनिव्हर्सिटी येथे हा कोर्स शिकवला जातो. डिजिटल कंटेंट क्रिएटर, मल्टीमीडिया जर्नालिस्ट, PR स्पेशालिस्ट अशा नोकऱ्या यात मिळतात.
‘बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट’ हा कोर्ससुद्धा आर्ट्स विद्यार्थ्यांसाठी चांगला पर्याय आहे. यात कॉन्सर्ट, वेडिंग्स आणि कॉर्पोरेट इव्हेंट्सचे प्लॅनिंग शिकवले जाते. IGNOU, DAV कॉलेज आणि NAEMD मुंबई येथे हा कोर्स शिकता येतो. इव्हेंट प्लॅनर, वेडिंग कोऑर्डिनेटर अशी करिअर संधी यात आहेत. शेवटचा कोर्स आहे ‘बॅचलर ऑफ हॉस्पिटॅलिटी अॅन्ड टुरिझम मॅनेजमेंट’, ज्यामध्ये ट्रॅव्हल, टुरिझम आणि हॉटेल मॅनेजमेंटशी संबंधित स्किल्स शिकवले जातात. IITTM ग्वालियर, दिल्ली युनिव्हर्सिटी आणि क्राइस्ट युनिव्हर्सिटी येथे हे शिकवले जाते. यामध्ये टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल कन्सल्टंट, हॉटेल मॅनेजर अशा नोकऱ्यांचे पर्याय आहेत. एकंदरीत, आर्ट्स स्ट्रीमसाठी आता संधींची कमतरता नाही. योग्य कोर्सची निवड करून विद्यार्थ्यांना उज्वल करिअर घडवता येऊ शकते.