फोटो सौजन्य - Social Media
आजच्या स्पर्धात्मक युगात तरुणांना चांगल्या करिअरचा शोध असतो. त्यात सैलरी, स्किल डेव्हलपमेंट आणि करिअर ग्रोथ या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. अशा सगळ्या अपेक्षांवर एमबीए (MBA) कोर्स 100% खरा उतरतो. एमबीए ही केवळ एक डिग्री नसून, ती विद्यार्थ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, व्यावसायिक ओळख आणि उद्योजकतेचा मार्ग मोकळा करून देते.
MBA केल्यानंतर सर्वात मोठा फायदा म्हणजे पगार. विशेषतः IIM सारख्या टॉप इन्स्टिट्यूटमधून एमबीए करणाऱ्यांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळते. उदाहरणच द्यायचं झालं तर, 2023 मध्ये IIM अहमदाबादच्या PGP विद्यार्थ्यांना सरासरी ₹34.36 लाख वार्षिक पॅकेज मिळालं, तर काहींना ₹1.15 कोटी इतकं पॅकेज मिळालं. या आकड्यांवरूनच एमबीएचं व्यावसायिक महत्त्व दिसून येतं.
कम्युनिकेशन आणि मॅनेजमेंट स्किल्स
एमबीए कोर्स दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये कम्युनिकेशन स्किल, टीमवर्क, लीडरशिप, निर्णय क्षमता, प्रेझेंटेशन स्किल्स यांचा विकास होतो. या स्किल्समुळे विद्यार्थ्यांची पर्सनालिटी ओळखण्याजोगी बदलते आणि ते कोणत्याही प्रोफेशनल सिच्युएशनमध्ये सहज सामावून जातात.
नोकरीच्या अफाट संधी
एमबीए झाल्यानंतर मार्केटिंग, फायनान्स, ऑपरेशन्स, एचआर, डेटा अॅनालिटिक्स, कन्सल्टिंग यांसारख्या विविध क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी मिळतात. भारतातच नव्हे तर परदेशातही एमबीए प्रोफेशनल्सची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. कंपन्या अशा मॅनेजमेंट-तज्ज्ञ व्यक्तींना उच्च पगारासह कामावर घेतात.
स्वतःचा स्टार्टअप
एमबीए केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. व्यवसायाचे नियोजन, मार्केट अॅनालिसिस, टीम मॅनेजमेंट, फायनान्स प्लॅनिंग यासारखी कौशल्ये एमबीएमुळे येतात. त्यामुळे अनेक एमबीए विद्यार्थी स्वतःचा स्टार्टअप सुरू करून यशस्वी उद्योजक बनले आहेत.
प्रोफेशनल नेटवर्क तयार होणे
एमबीए कोर्स दरम्यान इतर विद्यार्थ्यांबरोबर तसेच इंडस्ट्री तज्ज्ञांशी संपर्क येतो. यामुळे प्रोफेशनल नेटवर्क तयार होतं आणि करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत होते. हाच नेटवर्क भविष्यातील संधींचं दार उघडतो.