
Dr. Sarvepalli Radhakrishnan Education
Dr. Sarvepalli Radhakrishnan Education: भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस देशाचे महान दार्शनिक, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पाळला जातो. त्यांचे जीवन या गोष्टीचे उत्तम उदाहरण आहे की शिक्षण आणि ज्ञान एखाद्या व्यक्तीला समाजात मान मिळवून देण्यासोबतच देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचवू शकतात. डॉ. राधाकृष्णन १९६२ ते १९६७ या काळात भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. पण, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन नेमके किती शिकलेले होते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला चला तर मग जाणून घेऊया.
डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षण प्रामुख्याने तत्त्वज्ञान (Philosophy) या क्षेत्रात झाले होते. त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आणि पुढे जाऊन ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. त्यांच्या शैक्षणिक जीवनाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भारतीय दर्शन आणि धर्म जगासमोर अत्यंत प्रभावीपणे मांडला.
सरकारी प्रोफाईलनुसार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये एम.ए., डी.लिट., एलएलडी, डीसीएल, लिटरेचर डॉक्टरेट आणि इतर अनेक मानद पदव्यांचा समावेश आहे. त्यांना ऑक्सफर्डच्या ऑल सोल्स कॉलेजचे मानद फेलो देखील बनवण्यात आले होते. त्यांचा शैक्षणिक प्रभाव एवढा मोठा होता की त्यांनी म्हैसूर विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठात अध्यापन केले. याशिवाय त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘ईस्टर्न रिलिजन अँड एथिक्स’ या विषयाची स्पॉल्डिंग प्रोफेसरशिप देखील मिळाली होती.
DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज
डॉ. राधाकृष्णन यांची कारकीर्द फक्त पुस्तके आणि वर्गापुरती मर्यादित नव्हती. ते आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू (Vice Chancellor) देखील राहिले आहेत. याशिवाय त्यांनी युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या विचारांमध्ये शिक्षणाला समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन मानले गेले आहे. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानावर अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांमध्ये ‘इंडियन फिलॉसॉफी’, ‘द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ’, ‘अॅन आयडियलिस्ट व्ह्यू ऑफ लाईफ’, ‘ईस्टर्न रिलिजन अँड वेस्टर्न थॉट’ आणि ‘द प्रिन्सिपल उपनिषद्स’ यांसारख्या ग्रंथांचा समावेश आहे.
‘Rich Dad Poor Dad’ चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज; नेमके प्रकरण काय?
भारतात १९६२ मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. त्या काळात डॉ. राधाकृष्णन आधीच दोन वेळा उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण करून देश-विदेशात एक प्रतिष्ठित दार्शनिक आणि राजकारणी म्हणून ओळखले जात होते. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार, १९६२ च्या राष्ट्रपती निवडणुकीत डॉ. राधाकृष्णन विजयी झाले आणि १३ मे १९६२ रोजी त्यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्यांचा कार्यकाळ १३ मे १९६२ ते १२ मे १९६७ पर्यंत चालला. १९५४ मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’ या पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.