Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल

Jawahar Balbhavan Ganeshotsav : महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मुंबई येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक उपक्रमांना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 03, 2026 | 03:40 PM
DADA BHUSE

DADA BHUSE

Follow Us
Follow Us:

Jawahar Balbhavan Ganeshotsav : जवाहर बालभवनमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कला, सृजनशीलता आणि नवोन्मेषी विचारांना चालना मिळते. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले.

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक आणि सर्जनशील उपक्रमांना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल तसेच शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे नुकतेच कौतुक केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळावा तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनतर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘गणेश मूर्ती कृतिसत्र’, ‘वेशभूषा स्पर्धा’ आणि ‘गणेश मूर्ती बनविणे स्पर्धा’ अशा विविध उपक्रमांचे २ ते ९ सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

Corporate Dress Code For Freshers: ऑफिसमध्ये जाताना फ्रेशर्सनी पोशाखाबाबत कोणती घ्यावी काळजी? जाणून घ्या

इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती कृतिसत्र आयोजित करण्यात आले असून, इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पौराणिक वेशभूषेवर आधारित वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण, संस्कृती आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय संस्कृतीबाबतची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तसेच विविध कलाकृतींची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि भारतीय संस्कृतीबाबतची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन ही संस्था ४ ते १६ वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ठरत असल्याची माहिती बालभवनच्या संचालक नीता पाटील यांनी यावेळी दिली.

Web Title: Jawahar balbhavan mumbai ganeshotsav activities dada bhuse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • dada bhuse
  • education
  • Ganesh Festival

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या
1

Vidyanand Bapat Pune : विद्यानंद बापट कोण आहेत? त्यांचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या

सरकारचा मोठा निर्णय; राज्यभर ‘चला शाळेत जाऊ’ अभियान, प्रत्येक जिल्ह्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘शिक्षण पालक’ म्हणून नियुक्ती
2

सरकारचा मोठा निर्णय; राज्यभर ‘चला शाळेत जाऊ’ अभियान, प्रत्येक जिल्ह्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘शिक्षण पालक’ म्हणून नियुक्ती

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय
3

Kareena Kapoor Education: ११वीतच सोडलं शिक्षण; आजही खंत, तैमूर-जेहसाठी घेतला ‘हा’ निर्णय

‘… या गोष्टींना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे’; मंत्री Dada Bhuse यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4

‘… या गोष्टींना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे’; मंत्री Dada Bhuse यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.