Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Opportunity for Engineering Students: बंगळुरू DRDO मध्ये रिसर्च शिकण्याची संधी; ११ ऑक्टोबरपर्यंत करा ई-मेल द्वारे अर्ज

Opportunity for Engineering Students: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजेच DRDO ने कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी 'पेड इंटर्नशिप'ची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. ही इंटर्नशिप 'कॉम्बॅट एअरक्राफ्ट सिस्टम डेव्हलपमेंट अँड इंटिग्रेशन सेंटर' म्हणजेच CASDIC मध्ये होणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 14, 2026 | 04:41 PM
engeirning

engeirning

Follow Us
Follow Us:

Opportunity for Engineering Students: कॉलेजचे शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी जर एखाद्या प्रतिष्ठित सरकारी संशोधन संस्थेत काम करण्याचा अनुभव मिळाला, तर ही करिअरसाठी एक मोठी संधी ठरू शकते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजेच DRDO ने कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पेड इंटर्नशिप’ची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. ही इंटर्नशिप ‘कॉम्बॅट एअरक्राफ्ट सिस्टम डेव्हलपमेंट अँड इंटिग्रेशन सेंटर’ म्हणजेच CASDIC मध्ये होणार आहे. यामध्ये एकूण ३० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून इंटर्नशिपचा कालावधी ६ महिने असेल.

ही इंटर्नशिप मुख्यत्वे इंजिनिअरिंग आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. उपलब्ध जागांमध्ये:

  • इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन: १२ जागा
  • कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी: १३ जागा
  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग: ५ जागा
अशा प्रकारे एकूण ३० उमेदवारांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. CASDIC हे बंगळुरू येथे स्थित DRDO चे एक प्रमुख केंद्र आहे, जिथे विद्यार्थ्यांना संबंधित तांत्रिक क्षेत्रातील प्रोजेक्ट्स आणि संशोधनाशी जोडलेले काम शिकण्याची संधी मिळेल.

शैक्षणिक पात्रता काय असावी?

बी.ई. / बी.टेक (BE/BTech): अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागील सेमिस्टरमध्ये किमान 7.5 CGPA असणे आवश्यक आहे.

सायन्स मधील पदव्युत्तर शिक्षण (MSc): पहिल्या वर्षात किमान 70% गुण असणे आवश्यक आहे.

इतर अटी: उमेदवार AICTE किंवा UGC मान्यताप्राप्त संस्थेतून फुल-टाईम कोर्स करणारा असावा.

वयोमर्यादा: अर्जदाराचे कमाल वय २५ वर्षे असावे.

दरमहा किती स्टायपेंड मिळणार?

ही इंटर्नशिप पूर्णपणे ‘पेड’ आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ₹५,००० प्रति महिना स्टायपेंड मिळेल. सहा महिन्यांच्या संपूर्ण कालावधीत एकूण ₹३०,००० स्टायपेंड दिले जाईल.

महत्त्वाची नोंद: बंगळुरू येथील निवास आणि इतर वैयक्तिक खर्च उमेदवाराला स्वतःच करावे लागतील. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी राहण्याची सोय आणि खर्चाचे नियोजन लक्षात घेणे गरजेचे आहे.

परीक्षा न घेता होणार का निवड?

या इंटर्नशिपसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड त्यांच्या मागील शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे आणि ऑनलाईन मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर माहिती पाठवली जाईल.

UPSC Preparation Strategy: १६ तास वाचनाची गरज नाही! फक्त ६ तासांच्या अभ्यासाने व्हा आयएएस; वाचा टॉपर्सचा सक्सेस फॉर्म्युला

अर्जाची अंतिम तारीख काय आहे?

अर्जाची शेवटची तारीख: ११ ऑक्टोबर २०२६

इंटर्नशिपची सुरुवात: १ डिसेंबर २०२६ पासून.

अर्ज कसा करावा?: अर्जाचा विहित नमुना अधिकृत सूचनेत दिलेला आहे. उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक ‘Reference/Request Letter’ नियमांनुसार hrd.casdic@gov.in या ई-मेल आयडीवर पाठवायचा आहे.

इंटर्नशिप पूर्ण केल्यावर काय मिळेल?

सहा महिन्यांची इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र (Certificate) दिले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना दिलेला प्रोजेक्ट, रिपोर्ट आणि इतर अटी पूर्ण कराव्या लागतील. जर एखाद्या विद्यार्थ्याने इंटर्नशिप मध्यंतरी सोडली, तर त्याला प्रमाणपत्र किंवा उर्वरित स्टायपेंड मिळणार नाही.

इंटर्नशिप नंतर नोकरी मिळेल का?

DRDO किंवा CASDIC मधील ही इंटर्नशिप पूर्ण केली म्हणजे थेट नोकरी मिळेल असे नाही. सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे की, इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर CASDIC/DRDO कोणत्याही प्रकारच्या रोजगारासाठी बंधनकारक असणार नाही. त्यामुळे याकडे फक्त प्रात्यक्षिक अनुभव आणि तांत्रिक ज्ञान मिळवण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे.

Career Guidance 2026: १२ वी नंतर ‘हे’ ५ कोर्सेस घेण्यापूर्वी एकदा विचार करा; पैसा अन् वेळ दोन्ही होईल वाया!

अर्ज करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची नोंद घ्या:

जाहिरात क्रमांक: CASDIC/HRG/PDINTERN/2026/01

एकूण जागा: ३० जागा

कालावधी: ६ महिने

स्थान: CASDIC, बंगळुरू – ५६००९३
इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी DRDO/CASDIC च्या अधिकृत सूचनेमधील सर्व अटी व शर्तींची पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी.

Web Title: Drdo casdic internship 2026 btech msc engineering students stipend application

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • education
  • Engineering

संबंधित बातम्या

Career Guidance 2026: १२ वी नंतर ‘हे’ ५ कोर्सेस घेण्यापूर्वी एकदा विचार करा; पैसा अन् वेळ दोन्ही होईल वाया!
1

Career Guidance 2026: १२ वी नंतर ‘हे’ ५ कोर्सेस घेण्यापूर्वी एकदा विचार करा; पैसा अन् वेळ दोन्ही होईल वाया!

BRICS Education : आता फक्त डिग्री पुरेशी नाही! ब्रिक्स देशांच्या नव्या अजेंड्यामुळे ‘या’ स्किल्सना येणार मोठी मागणी
2

BRICS Education : आता फक्त डिग्री पुरेशी नाही! ब्रिक्स देशांच्या नव्या अजेंड्यामुळे ‘या’ स्किल्सना येणार मोठी मागणी

धक्कादायक! MBBS ची फीस थेट ५६ टक्क्यांनी वाढली; एका झटक्यात १ कोटींवर पोहोचला शिक्षणाचा खर्च!
3

धक्कादायक! MBBS ची फीस थेट ५६ टक्क्यांनी वाढली; एका झटक्यात १ कोटींवर पोहोचला शिक्षणाचा खर्च!

AI and coding: इंग्रजीची भीती संपली! आता मातृभाषेत शिका कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स..
4

AI and coding: इंग्रजीची भीती संपली! आता मातृभाषेत शिका कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.