फोटो सौजन्य- नवराष्ट्र टीम
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी येतात. अकरावीपासून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुणही आहेत. मात्र, दुष्काळामुळे कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावली आहे. घरून मदत मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन हा उपक्रम राबविला जात आहे. सदाशिव पेठ, एकलव्य अभ्यासिका (गांजवे चौक), शिवाजीनगर गावठाण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात जेवण दिले जाणार आहे. गरज आणि प्रतिसाद पाहून भोजन केंद्रांची संख्या वाढविली जाणार आहे. असे सानप यांनी सांगितले.
Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील वेदांत वाघने रचला इतिहास; सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत…
अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र असतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ घेता येणार आहे. मुलाखत आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून निवड होणार आहे. निवड झालेल्यांना स्वतंत्र ओळखपत्र दिले जाणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार निवड होणार आहे. सुरुवातीला ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
एकल पाल्य असलेल्या मुली, अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच नोंदणीसाठी संपर्क : सौरभ काळुशे – ७७७५८४१९१९, रणजीत पवार – ९०७५३३९६५१. पत्ता : एकलव्य अभ्यासिका आणि हॉस्टेल, रामचंद्र अपार्टमेंट, ५८६, केळकर रोड, नारायण पेठ पोलीस चौकीजवळ, पुणे.






