Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Scholarship Pune: पुण्यात १ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दोन वेळचे जेवण; असा करा नोंदणीसाठी संपर्क

Food Scholarship Pune: दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पुण्यातील १,००० विद्यार्थ्यांना शिवसेनेतर्फे 'फूड स्कॉलरशिप' अंतर्गत दोन वेळचे मोफत जेवण दिले जाणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 22, 2026 | 04:16 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसेनेचा मदतीचा हात
  • एक हजार विद्यार्थ्यांना मिळणार ‘फूड स्कॉलरशिप’
  • दोन वेळच्या जेवणाची चिंता मिटणार
Food Scholarship Pune: राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना ‘फूड स्कॉलरशिप’ दिली जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. अशी माहिती प्रा. सचिन सानप यांनी दिली.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी येतात. अकरावीपासून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुणही आहेत. मात्र, दुष्काळामुळे कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावली आहे. घरून मदत मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन हा उपक्रम राबविला जात आहे. सदाशिव पेठ, एकलव्य अभ्यासिका (गांजवे चौक), शिवाजीनगर गावठाण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात जेवण दिले जाणार आहे. गरज आणि प्रतिसाद पाहून भोजन केंद्रांची संख्या वाढविली जाणार आहे. असे सानप यांनी सांगितले.

Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील वेदांत वाघने रचला इतिहास; सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत…

मुलाखत आणि उत्पन्नाच्या आधारे निवड

अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र असतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ घेता येणार आहे. मुलाखत आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून निवड होणार आहे. निवड झालेल्यांना स्वतंत्र ओळखपत्र दिले जाणार आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार निवड होणार आहे. सुरुवातीला ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

Free MBA Scholarship: ग्रामीण व वंचित विद्यार्थ्यांना मोफत एमबीएची संधी; ऑलकार्गो समूहाचे १५ कोटींचे योगदान

या विद्यार्थ्यांना मिळणार प्राधान्य: येथे करा नोंदणी

एकल पाल्य असलेल्या मुली, अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच नोंदणीसाठी संपर्क : सौरभ काळुशे – ७७७५८४१९१९, रणजीत पवार – ९०७५३३९६५१. पत्ता : एकलव्य अभ्यासिका आणि हॉस्टेल, रामचंद्र अपार्टमेंट, ५८६, केळकर रोड, नारायण पेठ पोलीस चौकीजवळ, पुणे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: या 'फूड स्कॉलरशिप' योजनेअंतर्गत किती विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे?

    Ans: पुण्यात शिक्षण घेणाऱ्या सुमारे १,००० गरजू विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण दिले जाणार आहे.

  • Que: या योजनेसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत?

    Ans: अकरावीपासून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणारे तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे दुष्काळग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थी पात्र आहेत. एकल पाल्य असलेल्या मुली, अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.

  • Que: पुण्यात कोठे जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे?

    Ans: सदाशिव पेठ, एकलव्य अभ्यासिका (गांजवे चौक), शिवाजीनगर गावठाण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात भोजन केंद्रांची व्यवस्था असेल.

Web Title: Shiv sena food scholarship 1000 students free meals pune marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • education
  • food
  • Scholarship Exam
  • shivsena

संबंधित बातम्या

Free MBA Scholarship: ग्रामीण व वंचित विद्यार्थ्यांना मोफत एमबीएची संधी; ऑलकार्गो समूहाचे १५ कोटींचे योगदान
1

Free MBA Scholarship: ग्रामीण व वंचित विद्यार्थ्यांना मोफत एमबीएची संधी; ऑलकार्गो समूहाचे १५ कोटींचे योगदान

Food recipe: आवळ्याचा गोड लोणचा कधी खाल्लाय का? घरच्या घरी बनवा झटपट आणि चविष्ट रेसिपी
2

Food recipe: आवळ्याचा गोड लोणचा कधी खाल्लाय का? घरच्या घरी बनवा झटपट आणि चविष्ट रेसिपी

Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील वेदांत वाघने रचला इतिहास; सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत…
3

Golden Quadrilateral Solo Ride: पुण्यातील वेदांत वाघने रचला इतिहास; सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत…

NMC Appeal Fee Hike: वैद्यकीय महाविद्यालयांच्या अपील शुल्कात मोठी वाढ; सरकारी आणि खासगी संस्थांसाठी नवे दर
4

NMC Appeal Fee Hike: वैद्यकीय महाविद्यालयांच्या अपील शुल्कात मोठी वाढ; सरकारी आणि खासगी संस्थांसाठी नवे दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.