
Image
पुण्यातील एक मोटारसायकलस्वार वेदांत वाघ याने हा पराक्रम केला आहे. भारती विद्यापीठ इंजिनीअरिंग कॉलेज मेकॅनिकल इंजिनिअरचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेला वेदांत याने दिवाळीच्या सुट्टीत हा प्रवास करण्याचे ठरवले. आवड होतीच आणि घरच्यांनी पाठींबा दिला. नुसता प्रवास करण्यापेक्षा काही नवीन विक्रम करता येईल का? असा विचार होता. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधील एक विक्रम सापडला सर्वात कमी वयात सुवर्ण चतुष्कोण पूर्ण करणे.
पूर्वीचा विक्रम 2020 मधील 19 वर्ष 11 महिने वयाच्या मुलाचा होता. त्याने 16 दिवसात हा प्रवास केला होता. हा विक्रम मोडण्याचे वेदांतने ठरवले. वेदांतचे वय होते 18 वर्ष 8 महिने. 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.17 ला भारती विद्यापीठ धनकवडी येथून प्रवासास सुरवात केली. मनात धाकधूक होतीच पण तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर हा प्रवास यशस्वीरीत्या 21 नोव्हेंबर रोजी पूर्ण केला आणि नवीन इतिहास रचला. 12 दिवस 9 तासांत 6049 किमीचा हा प्रवास पूर्ण करून भारतातील पहिला सर्वात कमी वयात व या वयोगटातील सर्वात कमी वेळेत एकट्याने (सोलो राईड) करणारा तो ठरला.
शालेय वयापासून की ग्रॅज्युएशननंतर? UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू करण्याची योग्य वेळ कोणती?
त्याच्या या साहसी उपक्रमाबद्दल सत्कार करताना महाराष्ट्र राज्य मालक व प्रवासी वाहतूक संघटना व भारती विद्यापीठ परिवाराचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे म्हणाले, एवढ्या कमी वयात असा प्रवास करणे हे खंबीर मानसिक क्षमतेचे प्रतीक आहे. असा साहसी प्रवास करणारा वेदांत तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
भारती विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. स्वप्निल विधाते म्हणाले असा प्रवास म्हणजे साहसी खेळाचा अत्युच्च उपक्रम आहे. रस्तावर अनेक धोके असतात. त्यामुळे सतत 13 दिवस दररोज 500 किमी एकाग्रतेने गाडी चालवणे हे त्या व्यक्तीची उच्च क्षमता अधोरेखित करते. यावेळी बोलताना वेदांतने प्रवासात आलेल्या अडचणी व आपला अनुभव कथन केला. प्रकुलगुरू डॉ. विश्वजीत कदम यांनी त्याचे अभिनंदन केले. यावेळी भारती विद्यापीठ परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ans: वेदांत वाघ हा पुण्यातील भारती विद्यापीठ इंजिनीअरिंग कॉलेजचा प्रथम वर्षाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. त्याने सर्वात कमी वयात आणि कमी वेळेत एकट्याने (सोलो राईड) मोटारसायकलवरून भारताचा सुवर्ण चतुष्कोण मार्ग पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.
Ans: त्याने १२ दिवस ९ तासांत ६,०४९ किमीचा प्रवास पूर्ण केला. ९ नोव्हेंबर रोजी धनकवडी, भारती विद्यापीठातून सुरुवात करून त्याने २१ नोव्हेंबर रोजी हा प्रवास यशस्वी केला.
Ans: यापूर्वी २०२० मध्ये १९ वर्षे ११ महिने वयाच्या मुलाने १६ दिवसांत हा प्रवास केला होता. वेदांतने वयाच्या १८ वर्षे ८ महिन्यांत आणि १२ दिवसांत हा टप्पा गाठून नवा विक्रम रचला.