फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Hindu College Delhi University Protest: दिल्ली विद्यापीठातील (DU) प्रतिष्ठित हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया आणि प्रशासकीय कारभारावरून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन सध्या तिसऱ्या आठवड्यात पोहचले आहे. या संपूर्ण वादाचे प्रमुख मुद्दे आज आपण जाणून घेणार आहोत.
२०२६-२७ सत्राच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेशादरम्यान, स्पोर्ट्स आणि एक्स्ट्रा करिकुलम ॲक्टिव्हिटी (ECA) कोटामध्ये ठरवलेल्या २० टक्के मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचा आरोप हिंदू कॉलेज स्टाफ असोसिएशनने (HCSA) केला आहे.
एकूण ४८ पैकी बीकॉम ऑनर्समध्ये १७ आणि बीए ऑनर्स पॉलिटिकल सायन्समध्ये १५ जागा अतिरिक्त दिल्या गेल्या. दिल्ली विद्यापीठाने यामागे ॲडमिशन अल्गोरिदममधील चूक असल्याचे स्पष्ट केले आहे, तर कॉलेजच्या प्रिन्सिपल प्रा. अंजू श्रीवास्तव यांनी प्रवेश प्रक्रियेत आपली थेट भूमिका नसल्याचे म्हटले आहे.
हा विवाद केवळ प्रवेशापुरता मर्यादित न राहता प्रशासकीय कारभारापर्यंत पोहोचला आहे. शिक्षक संघाने स्टाफ कौन्सिलच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले असून, काही प्रकरणांमध्ये समांतर समित्यांच्या माध्यमातून त्यांची भूमिका डावलली गेल्याचा आरोप केला आहे. तसेच स्टडी लीव्ह, चाइल्ड केअर लीव्ह, सब्बैटिकल आणि पदोन्नतीमधील विलंबाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.
कॉलेजच्या वित्तीय कामकाजात व खरेदी प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये हॉस्टेल मेस टेंडर, सुरक्षा व सफाई सेवांची आउटसोर्सिंग, व्यावसायिक वापर आणि बांधकाम कामांची चौकशी करण्याची मागणी शिक्षक संघाने केली आहे. गव्हर्निंग बॉडीच्या बैठकांचे मिनिट्स, ऑडिट केलेले हिशेब, कॅग (CAG) अहवाल आणि शुल्काशी संबंधित माहिती सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
आंदोलनादरम्यान देण्यात आलेल्या निवेदनांमुळे हिंदू कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीने एचसीएसएचे अध्यक्ष रतन लाल, सचिव शंकर कुमार आणि असोसिएट प्रोफेसर पी. के. विजय यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. यावर शिक्षक संघाने तीव्र विरोध दर्शवत हे आंदोलन सामूहिक निर्णयाचा भाग असल्याचे म्हटले आहे.
Nikhil Kamath Startups:’पुढचा काळ वाईट..’; निखिल कामथ यांच्या ‘या’ इमोजीमुळे स्टार्टअप जगतात खळबळ
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी प्रदर्शनकारी शिक्षक आणि विद्यार्थी दिल्ली विद्यापीठाच्या कुलपती कार्यालयापर्यंत मोर्चा काढून साउथ कॅपेसचे निदेशक रजनी अब्बी यांना निवेदन सादर केले.






