सिंधुदुर्गमध्ये पोलिस भरती होणार (फोटो- सोशल मीडिया)
सिंधुदुर्गनगरीत पोलिस भरतीसाठी उमेदवार दाखल
८७ पदासाठी ७हजार २९८ अर्ज
सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज
सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून रिक्त असलेला एकूण ८७ पदासाठी २० ते २८ फेबुवारीपर्यंत भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी तब्बल ७ हजार २९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. शुक्रवारपासून (दि. २०) प्रत्यक्ष पोलीस ग्राऊंडवर भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने भरतीसाठी सिधुदुर्गनगरीत उमेदवार दाखल होऊ लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील ७८ पोलिस शिपाई व ०९ पोलीस शिपाई चालक रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. पोलिस शिपाई पदासाठी ४०८३ व पोलिस शिपाई चालक पदासाठी ३ २१५ असे एकूण ७२९८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज
पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारिरीक, मैदानी चाचणी दि. २० ते दि. २८ फेब्रुवारी कालावधीत टप्याटप्याने घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग सिडको भवनसमोरील जिल्हा होमगार्ड कार्यालयात ही प्रक्रिया होणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार व भ्रष्टाचार टाळण्याासी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कडक निगराणी असणार असून – ड्रोन कॅमेन्याद्वारे करडी नजर असणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिशाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
महाराष्ट्रात जम्बो पोलीस भरती!
महाराष्ट्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदांच्या रिक्त जागांसाठी यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील मंजूर पदे भरण्याची प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ती २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई या पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेस मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण १४८ जागांसाठी १५ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. पोलीस शिपाईपदासाठी १२३ जागा असून यासाठी ४,८१७ अर्ज आले आहेत. या आकडेवारीवरून भरती प्रक्रियेत तीव्र स्पर्धा असल्याचे स्पष्ट होत आहे.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून त्यासाठी टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. शारीरिक मोजमाप चाचणीत सर्व उमेदवारांची उंची व छाती मोजमाप तपासले जाईल. पन्नास गुणांच्या मैदानी चाचणीत शारीरिक मोजमापात पात्र ठरलेल्या उमेदवारांची धावणे व इतर शारीरिक कसोटीची मैदानी चाचणी घेतली जाईल.






