Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ex Agniveer CAPF Recruitment: माजी अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सीएपीएफ भरतीत ५०% आरक्षण देणार?

Agniveer 50 Percent Reservation: केंद्र सरकारकडून माजी अग्निवीरांसाठी सीएपीएफ आणि असाम रायफल्स भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण आणि वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 22, 2026 | 10:08 AM
AGNIVEER

AGNIVEER

Follow Us
Follow Us:

Agniveer 50 Percent Reservation: अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता माजी अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आणि असाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल आणि रायफलमॅनच्या पदांवरील भरतीमध्ये विशेष लाभ मिळतील. सरकारने त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वर्ग तयार केला असून, त्यामध्ये ५० टक्के आरक्षण, वयोमर्यादेत सूट आणि भरती प्रक्रियेत अनेक सवलती दिल्या जातील. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

माजी अग्निवीरांसाठी तयार केली स्वतंत्र कॅटेगरी

सरकारने सीएपीएफ (CAPF) आणि असाम रायफल्समधील कॉन्स्टेबल व रायफलमॅन भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी एक स्वतंत्र वर्ग तयार केला आहे. या प्रवर्गाअंतर्गत उपलब्ध रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे माजी अग्निवीरांसाठी आरक्षित राहतील. सैन्यात सेवा बजावणाऱ्या तरुणांना पुढेही सुरक्षा दलांमध्ये रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने म्हटले आहे.

वयोमर्यादेत मिळणार ३ ते ५ वर्षांपर्यंत सूट

सरकारने वयोमर्यादेबाबतही मोठा दिलासा दिला आहे. माजी अग्निवीरांना भरतीमध्ये कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट मिळणार आहे. तर, अग्निपथ योजनेच्या पहिल्या तुकडीतील माजी अग्निवीरांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची विशेष सवलत दिली जाईल. यामुळे पहिल्या तुकडीतील उमेदवारांना भरतीमध्ये रोजगाराच्या अधिक संधी मिळू शकतील.

गृह मंत्रालयाने माजी अग्निवीरांचे करिअर आणि भविष्य लक्षात घेऊन एक विशेष ‘एक्स अग्निवीर विंग’ (Ex Agniveer Wing) देखील स्थापन केले आहे. सैन्यातून बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांना पुढील रोजगार आणि करिअरमध्ये उत्तम समन्वय व मदत उपलब्ध करून देणे हा याचा हेतू आहे.

IIT Alumnus Viral Post: ”आयआयटीतील ४ वर्षांचे शिक्षण तुरुंगासारखे..”; पदवीधराच्या व्हायरल पोस्टवर का होतेय सोशल मीडियावर चर्चा?

यावर्षी पूर्ण होणार पहिल्या तुकडीचा कार्यकाळ

अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या पहिल्या तुकडीतील अग्निवीरांनी अद्याप त्यांची चार वर्षांची सेवा पूर्ण केलेली नाही. सरकारनुसार, पहिली तुकडी या वर्षाच्या अखेरपर्यंत आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. त्यानंतर मोठ्या संख्येने माजी अग्निवीर सीएपीएफ आणि असाम रायफल्सच्या या भरतीसाठी पात्र ठरतील.

२५ टक्क्यांहून अधिक अग्निवीरांना कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव

दरम्यान, चार वर्षांनंतर कायमस्वरूपी सेवेत ठेवल्या जाणाऱ्या अग्निवीरांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव तिन्ही सैन्यादलांनी (स्थलसेना, नौसेना, वायुसेना) दिला असल्याचेही समोर आले आहे. अग्निपथ योजनेच्या सुरुवातीला चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे केवळ २५ टक्के अग्निवीरांनाच नियमित सेवेत ठेवले जाईल असे निश्चित करण्यात आले होते. परंतु आता तिन्ही दलांनी ही संख्या वाढवण्याची शिफारस केली आहे.

NEET Success Story: नीट यूजी परीक्षेपूर्वी मुलाचा मृत्यू, वडिलांनी दिली परीक्षा अन् आता ते बनणार डॉक्टर

भारतीय नौसेनेने सर्वात मोठा प्रस्ताव देत ही संख्या २५ टक्क्यांवरून ७५ टक्के करण्याची मागणी केली आहे. तर भूदल आणि हवाई दलाने ती ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. तथापि, या प्रस्तावाला अद्याप सरकारची अंतिम मंजुरी मिळालेली नाही आणि यासंदर्भात कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.

Web Title: Ex agniveer capf assam rifles recruitment reservation age relaxation 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • Agniveer Scheme
  • army
  • Army Jobs
  • Government Job

संबंधित बातम्या

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
1

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती
2

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.