Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी; Lloyds Metals कडून कर्टिन विद्यापीठासाठी अर्ज सुरू!

Lloyds Metals Global Education Program : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) आणि लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन यांच्यातर्फे 'ग्लोबल एज्युकेशन प्रोग्राम'च्या चौथ्या बॅचसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. दुर्गम भागातील २४ विद्यार्थी आधीच ऑस्ट्रेलियातील नामांकित कर्टिन विद्यापीठात शिक्षण घेत आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 17, 2026 | 10:41 AM
university

university

Follow Us
Follow Us:

Lloyds Metals Global Education Program : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांनी त्यांच्या ग्लोबल एज्युकेशन प्रोग्रामच्या चौथ्या बॅचसाठी अर्ज मागवले आहेत. या उपक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा कार्यक्रम श्री. बी. प्रभाकरन यांच्या गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठीच्या विविध उपक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमामुळे या भागातील २४ विद्यार्थी आधीच ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहेत.

ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम आता गडचिरोलीतील तरुणांसाठी मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर घडविण्याचा मार्ग ठरत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांनी बारावी (PCM/PCMB) किंवा विज्ञान शाखेतील पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवले आहेत, त्यांच्यासाठी १३ जून ते २० जून या कालावधीत अर्ज प्रक्रिया खुली आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला पाठबळ मिळणार

याबाबत बोलताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन म्हणाले की, “देशातील काही अत्यंत हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी अशा भागांतून येतात, जिथे संधींची कमतरता असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही गडचिरोलीतील पात्र विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत. या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत असून स्वतःसाठी नवीन संधी निर्माण करत आहेत, हे पाहून आनंद वाटतो.”

Internet Ban in Exams: परीक्षांमध्ये पेपर लीक रोखण्यासाठी थेट इंटरनेटच बंद? भारतातच नव्हे तर ‘या’ देशांमध्येही आहेत कडक नियम!

चौथ्या बॅचसाठी अर्ज प्रक्रिया १३ जून ते २० जून दरम्यान खुली

गडचिरोलीतील अनेक विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहते. ग्लोबल एज्युकेशन प्रोग्रामच्या माध्यमातून श्री. बी. प्रभाकरन हे हे अंतर कमी करण्याचे काम करत आहेत. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. चौथ्या बॅचसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याने हा कार्यक्रम अधिकाधिक तरुणांना शिक्षण, प्रगती आणि उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी देत आहे.

Telegram Ban: नीट परीक्षेसाठी आयटी मंत्रालयाने घेतलेल्या ‘या’ मोठ्या निर्णयावर Telegram Ceo संतापले!

Web Title: Gadchiroli student curtin university lloyds metals education application marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Australia
  • education
  • Gadchiroli

संबंधित बातम्या

QUAD : भारतासह चार देशांची मोठी रणनीती! AI, महत्त्वपूर्ण खनिजे आणि समुद्री सुरक्षेसाठी करणार सहकार्य
1

QUAD : भारतासह चार देशांची मोठी रणनीती! AI, महत्त्वपूर्ण खनिजे आणि समुद्री सुरक्षेसाठी करणार सहकार्य

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड
2

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!
3

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!

Hong Kong Sixes : ऑस्ट्रेलियाला नमवत अफगाणिस्तानने जिंकला जेतेपदाचा मान, इमरानची धुवांधार खेळी
4

Hong Kong Sixes : ऑस्ट्रेलियाला नमवत अफगाणिस्तानने जिंकला जेतेपदाचा मान, इमरानची धुवांधार खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.