Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

L वॉर्ड विज्ञान प्रदर्शनात गांधी शाळेची चमकदार कामगिरी! विविध स्पर्धांमध्ये घेतला सहभाग

हस्ताक्षर, निबंध, प्रश्नमंजुषा, जाहिरात, अभिवाचन आणि विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 11, 2025 | 02:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • गांधी बाल मंदिर शाळेने यंदा लक्षणीय यश मिळवत आपले वर्चस्व ठसवले
  • हस्ताक्षर, निबंध लेखन, प्रश्नमंजुषा, जाहिरात निर्मिती, अभिवाचन आणि विज्ञान प्रदर्शन
  • विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करत शाळेचे मुख्याध्यापक अनिल पाचाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले
एल वॉर्ड विभागात आयोजित विज्ञान प्रदर्शन तसेच विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये गांधी बाल मंदिर शाळेने यंदा लक्षणीय यश मिळवत आपले वर्चस्व ठसवले आहे. विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर, निबंध लेखन, प्रश्नमंजुषा, जाहिरात निर्मिती, अभिवाचन आणि विज्ञान प्रदर्शन अशा विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शाळेला उत्तुंग यश मिळवून दिले. या विद्यार्थ्यांचे मान शालेय परिसरात फार गाजतही आहे तसेच या मुलांचा अभिमान असल्याचे शालेय मुख्याध्यपकांचे म्हणणे आहे.

‘पत्रकारितेतील नव-प्रवाह’ पुस्तक प्रकाशित; आधुनिक माध्यमविश्वाची दिशा दाखवणारा संदर्भग्रंथ

या स्पर्धांमध्ये सोनाक्षी मोहिते, अन्विता गायकवाड, समृद्धी चांदवडे, श्लोक शिवतरकर, कुणाल मालप, भूषण शिंदे, भाविका त्रिकाळ, कृतिका चव्हाण आणि आकांक्षा नाईक या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विविध पारितोषिके पटकावली. त्यांच्या उत्तम सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली आणि शाळेचा मान उंचावला.

विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असून, संचिता कणसे आणि जयवंत कुलकर्णी या शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय, विज्ञान प्रदर्शनासाठी सादर केलेल्या उद्घाटन प्रकल्पासाठी अवधूत चव्हाण, अमोल जागले आणि घनश्याम जोशी यांच्या सर्जनशील कार्याचे आमदार अभ्यंकर यांच्या हस्ते विशेष कौतुक करण्यात आले. शाळेच्या सजावटीत आणि सादरीकरणात मोलाचे योगदान देणाऱ्या रत्नकांत विचारे आणि विश्वनाथ पांचाळ यांनाही फलक लेखन आणि रांगोळी सजावटीसाठी सन्मानित करण्यात आले.

Employment Outlook in India: नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर! पुढील वर्षात भारतातील 52% कंपन्या देणार नवा रोजगार

या सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करत शाळेचे मुख्याध्यापक अनिल पाचाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशीच प्रगती साधावी आणि शाळेचा गौरव वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या. गांधी बाल मंदिर शाळेचा हा सर्वांगीण यशस्वी उपक्रम शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात शाळेची गुणवत्ता आणि कर्तृत्व अधोरेखित करणारा ठरला आहे.c

Web Title: Gandhi school delivers a stellar performance at the l ward science exhibition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

Chhattisgarh News: शिक्षकांच्या जबाबदारीत आणखीन भर! आता ठेवावे लागणार साप-विंचूंवरही लक्ष, शिक्षक नाराज
1

Chhattisgarh News: शिक्षकांच्या जबाबदारीत आणखीन भर! आता ठेवावे लागणार साप-विंचूंवरही लक्ष, शिक्षक नाराज

फिलिप्सचा शिक्षण क्षेत्रातील मोठा उपक्रम! प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलायझेशनमुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी दारे
2

फिलिप्सचा शिक्षण क्षेत्रातील मोठा उपक्रम! प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलायझेशनमुळे विद्यार्थ्यांसाठी करिअरची नवी दारे

TFI फेलोजच्या येण्याने आराध्याचे बदलले जीवन! शिक्षणाबाबतची भीती झाली दूर, अंगीकृत केले नेतृत्व
3

TFI फेलोजच्या येण्याने आराध्याचे बदलले जीवन! शिक्षणाबाबतची भीती झाली दूर, अंगीकृत केले नेतृत्व

भारतातील पहिलाच ग्लोबल B. Design (Hons.) प्रोग्राम! उपलब्ध होणार आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी
4

भारतातील पहिलाच ग्लोबल B. Design (Hons.) प्रोग्राम! उपलब्ध होणार आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.