फोटो सौजन्य - Social Media
पत्रकारिता क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांना समजून घेण्यासाठी, नव्या माध्यम-संज्ञा आणि000000 आधुनिक पत्रकारितेची दिशा स्पष्ट करण्यासाठी तयार केलेले ‘पत्रकारितेतील नव-प्रवाह’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. माध्यम तज्ज्ञ डॉ. संजय रानडे यांच्या लेखणीतून तयार झालेले हे महत्त्वपूर्ण पुस्तक पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, संशोधक, अभ्यासक तसेच माध्यमांविषयी कुतूहल असणाऱ्या सर्व वाचकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. पुस्तकाच्या लेखनात प्रमोद सावंत आणि अरविंद परुळेकर यांनी सहाय्य केले असून, प्रकाशनाची जबाबदारी एज्युकेशनल पब्लिशर्स अँड डिस्ट्रिब्युटर्स, छत्रपती संभाजीनगर यांनी पार पाडली आहे.
नव्या संज्ञांचे स्पष्टीकरण आणि आधुनिक पत्रकारितेचे दर्शन
पुस्तकात एकूण १४ प्रकरणे असून प्रत्येक प्रकरण पत्रकारितेतील नव्या बदलांना, माध्यम-परिसराला आणि डिजिटल युगातील संकल्पनांना सोप्या भाषेत स्पष्ट करते.
या प्रकरणांमध्ये विशेषतः
माध्यमविश्वात वेगाने घडणारे बदल, तंत्रज्ञानाची घोडदौड आणि माहितीच्या प्रसारातील गतिशीलता लक्षात घेता या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांना एक दृढ, नैतिक आणि संवेदनशील दृष्टी देण्याची गरज आहे. या विषयाला न्याय देत पुस्तकाने केवळ माहितीपुरते सीमित न राहता माध्यमकर्मींनी स्वीकारावी अशी चिकित्सक दृष्टी, रुजवावी अशी जबाबदारी आणि बांधिलकी यांवरही भर दिला आहे.
“या पुस्तकाचा उद्देश फक्त माहिती देणे नसून, जबाबदार, जाणकार आणि बदल घडवणारा माध्यमकर्मी घडवण्यासाठी आवश्यक साधने व दृष्टिकोन उपलब्ध करून देणे हा आहे,” असे मत लेखक डॉ. संजय रानडे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक, अभ्यासकांसाठी संदर्भग्रंथ
पत्रकारिता क्षेत्राची ओळख करून घेऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी हे पुस्तक एक दिशादर्शक ठरणार आहे, तर माध्यम अभ्यासकांसाठी नव्या प्रवाहांचा वेध घेणारे मार्गदर्शक संदर्भग्रंथ ठरेल. डिजिटल पत्रकारितेपासून ते माध्यम-नीतीपर्यंत सर्व विषयांचा समतोल साधत हे पुस्तक आधुनिक पत्रकारितेचे संपूर्ण चित्र उलगडते.






