Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara SSC 10th Result : सातारा जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.71 टक्के; मुलींनी मारली बाजी

सातारा जिल्ह्याचा दहावीचा एकूण निकाल ९५.७१ टक्के लागला असून, गतवर्षीच्या ९६.७५ टक्क्यांच्या तुलनेत यंदा १.०४ टक्क्यांनी घट झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 08, 2026 | 05:59 PM
सातारा जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.71 टक्के; मुलींनी मारली बाजी

सातारा जिल्ह्याचा दहावीचा निकाल 95.71 टक्के; मुलींनी मारली बाजी

Follow Us
Follow Us:

शाहूपुरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या कोल्हापूर विभागीय मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) जाहीर करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.७१ टक्के लागला असून, गतवर्षीच्या ९६.७५ टक्क्यांच्या तुलनेत यंदा १.०४ टक्क्यांनी घट झाली आहे.

 

दहावी परिक्षेसाठी जिल्ह्यातून नियमित प्रवर्गातील ३६ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६ हजार ४१२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यामधून ३४ हजार ८५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून, मुलींचा निकाल ९७.२५ टक्के तर मुलांचा निकाल ९४.३१ टक्के लागला आहे.

सातारा जिल्ह्यातील १७ हजार ३१७ मुलींपैकी १६ हजार ८४१ मुली उत्तीर्ण झाल्या, तर १९ हजार ९५ मुलांपैकी १८ हजार ९ मुले उत्तीर्ण झाली आहेत. दरम्यान, पुनर्प्रविष्ट (रिपीटर) विद्यार्थ्यांचा निकाल मात्र समाधानकारक राहिला नाही. जिल्ह्यातील ७२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातून केवळ २७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ३८.६३ इतकी राहिली आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळात सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असून, विभागाचा एकूण निकाल ९५.४७ टक्के लागला आहे. विभागात कोल्हापूर जिल्ह्याने ९६.६७ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले असून, सातारा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. सांगली जिल्ह्याचा निकाल ९३.५६ टक्के लागला.

यंदाच्या परीक्षेसाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आली होती. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे निकालात काहीशी घट झाल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील ११६परीक्षा केंद्रांपैकी ११५ केंद्रांवर सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध होती.

दरम्यान, परीक्षोत्तर गैरमार्ग चौकशीत सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली असून, संबंधित विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण व निकाल महामंडळाचे संकेतस्थळ, तसेच निकाल अधिकृत संकेतस्थळ वर पाहता येतील अशी व्यवस्था शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली होती.

कोल्हापूर विभागीय मंडळात सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश असून विभागाचा एकूण निकाल ९५.४७ टक्के लागला आहे. विभागात कोल्हापूर जिल्ह्याने ९६.६७ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले असून, सातारा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. सांगली जिल्ह्याचा निकाल ९३.५६ टक्के लागला आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा आकडा समोर; पालकांना प्रवेशाबाबत सावधगिरीचे आवाहन

Web Title: Girls have dominated the 10th class results from satara district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Satara News
  • SSC Result
  • Student

संबंधित बातम्या

MBBS Seats Statistics: ‘एक सरकारी जागा, ३६ दावेदार!’ यंदा नीट परीक्षेत चुरस वाढली; जाणून घ्या सरकारी आणि खाजगी जागांची आकडेवारी
1

MBBS Seats Statistics: ‘एक सरकारी जागा, ३६ दावेदार!’ यंदा नीट परीक्षेत चुरस वाढली; जाणून घ्या सरकारी आणि खाजगी जागांची आकडेवारी

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी
2

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जण जखमी

भोसे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य, योग व जीवनशैली शिबिर संपन्न; १०० हून अधिक ज्येष्ठांची आरोग्य तपासणी!
3

भोसे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य, योग व जीवनशैली शिबिर संपन्न; १०० हून अधिक ज्येष्ठांची आरोग्य तपासणी!

B.Com Scholarship: बी.कॉम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ सरकारी स्कॉलरशिपबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
4

B.Com Scholarship: बी.कॉम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ सरकारी स्कॉलरशिपबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.