Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MBBS इच्छुकांसाठी खुषखबर, राज्यात 8 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी

एमबीबीएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून राज्यामध्ये ८ नवीन महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे प्रवेशसंख्या वाढणार आहे आणि जिल्हानिहाय वाढ झाल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 02, 2024 | 09:20 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

राज्यातील असंख्य विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी तयारी करतात. मात्र प्रत्येकालाच राज्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतोच असे नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी परराज्यात जातात अथवा  परदेशामध्ये शिक्षण घेतात. तसेच राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीनेही वैद्यकीय महाविद्यालयाची संख्या वाढणे आवश्यक होते. त्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात होते. आता मात्र विद्यार्थ्यांच्या आणि राज्याच्यादृष्टीने महत्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे.

राज्य शासनाच्या पाठपुराव्यामुळे राज्यात नवीन ८ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने मुंबई, नाशिक, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलडाणा, अंबरनाथ, भंडारा, आणि हिंगोली अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. या आठ महाविद्यालयात एकूण ८०० विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी  प्रवेश मिळणार आहे.

दरवर्षी ४८५० विद्यार्थ्यांना मिळणार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश

प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय असावे असे शासनाचे धोरण आहे. सध्या राज्यात एकूण ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत.त्यामुळे या  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दरवर्षी ४८५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी हे प्रचंड खर्च करुन विविध  देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जात होते. विद्यार्थी संख्या वाढल्याने आता विद्यार्थी राज्यातच शिक्षण घेऊ शकतात.

प्रत्येक महाविद्यालयास ४०३ कोटी रुपये

या महाविद्यालयांच्या बांधकामाकरिता व इतर आवश्यक साधनसामुग्रीसाठी प्रत्येक महाविद्यालयास ४०३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होण्यासाठी केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत महाविद्यालयाची बांधकाम निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच बांधकामे सुरू करण्यात येणार आहे.

एमबीबीएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय आनंद देणारी ठरणार आहे. मुख्यत: वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुरु होणाऱ्या महाविद्यालयांमुळे तेथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच या महाविद्यालयाद्वारे लोकांची आरोग्यसेवाही केली जाणार असल्याने लोकांनाही त्याचा प्रचंड लाभ होणार आहे.

Web Title: Good news for mbbs aspirants 8 new medical colleges approved in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 09:20 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

CM Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी रोजगार अन् कौशल्य विकासाचा संकल्प दृढ – मंत्री मंगल प्रभात लोढा
1

CM Fadnavis Birthday: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी रोजगार अन् कौशल्य विकासाचा संकल्प दृढ – मंत्री मंगल प्रभात लोढा

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
2

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी
3

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
4

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.