Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई

भंडारा जिल्ह्यात बनावट दस्तऐवज आणि सायबर फसवणुकीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. महाराष्ट्र रूरल एज्युकेशन सोसायटीच्या प्रकरणात शिक्का व स्वाक्षरीतील तफावतीनंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तर डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आरटीजीएसद्वारे 4,55,200 रुपये उकळल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 17, 2026 | 06:08 PM
Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई
Follow Us
Follow Us:
  • भंडाऱ्यात बनावट शिक्का आणि स्वाक्षरी असलेले दस्तऐवज सादर केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
  • डिजिटल अरेस्टच्या खोट्या धमकीने सायबर भामट्यांनी एका व्यक्तीकडून 4,55,200 रुपये आरटीजीएसद्वारे उकळले.
  • व्हॉट्सअॅपवर बनावट अटक कागदपत्रे पाठवून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची भीती दाखवत आरोपींनी विश्वास संपादन केला.

सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाची दिशाभूल करून खोटे व बनावट दस्तऐवज सादर केल्याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शैलेश कृष्णा खोब्रागडे (४६, रा. लाखांदूर) आणि राजेंद्र नारायण नागदेवे (६३, रा. तुळशीनगर, खात रोड, भंडारा) अशी आरोपींची नावे आहेत.

‘महाराष्ट्र रूरल एज्युकेशन सोसायटी’ या न्यासाच्या एका प्रकरणात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या मंजुरी आदेशानुसार विवादित दस्तऐवजाची पाहणी करण्यात आली. धर्मादाय कार्यालयातील आवक जावक विभागाचा मूळ शिक्का आणि दस्तऐवजावरील शिक्का यात तफावत आढळून आली. तसेच आवक-जावक लिपीक तुळसा गणपत दोडके यांच्या मूळ स्वाक्षरीशी दस्तऐवजावरील स्वाक्षरी जुळत नसल्याचा अहवाल अधीक्षकांकडे सादर करण्यात आला. कार्यालयाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने २०११ ते २०२४ या कालावधीतील लेखापरीक्षण अहवालाची

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

डिजीटल अरेस्टच्या नावाखाली ४.५० लाखांची फसवणूक

भंडारा. मोबाइलवर संपर्क साधून घरातच नजरकैदेत ठेवल्याचे भासवून आणि मनी लॉड्रिगची खोटी भीती घालून सायबर भामट्यांनी एकाची ४ लाख ५५ हजार २०० रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भंडारा सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध मोबाइल क्रमांकांवरून आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधला. फिर्यादीला घरीच नजरकैदेत ठेवून त्यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगची केस दाखल असल्याचे सांगण्यात आले. अटकेची बनावट कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर पाठवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आरटीजीएसच्या माध्यमातून आरोपींनी सांगितलेल्या बैंक खात्यात ४ लाख ५५ हजार २०० रुपये भरण्यास भाग पाडून ही फसवणूक केली. बनावट पोहोच पावती तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक मोरेश्वर रघुनाथ मातरे (५४) यांनी दिलेल्या अहवालावरून गुन्हा नोंदवण्यात आला.

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: भंडाऱ्यात बनावट दस्तऐवज प्रकरणात काय घडले?

उत्तर: महाराष्ट्र रूरल एज्युकेशन सोसायटीच्या प्रकरणातील दस्तऐवजावर असलेला शिक्का आणि स्वाक्षरी मूळ नोंदींशी जुळत नसल्याचे आढळले. या प्रकरणात शैलेश कृष्णा खोब्रागडे आणि राजेंद्र नारायण नागदेवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रश्न 2: डिजिटल अरेस्टच्या नावाखाली किती रुपयांची फसवणूक झाली?

उत्तर: या प्रकरणात सायबर भामट्यांनी एका व्यक्तीची 4,55,200 रुपयांची फसवणूक केली. मनी लॉन्ड्रिंगची खोटी केस आणि अटकेची भीती दाखवून आरटीजीएसद्वारे पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडण्यात आले.

प्रश्न 3: डिजिटल अरेस्टच्या फसवणुकीपासून कसे सावध राहावे?

उत्तर: फोन किंवा व्हिडिओ कॉलवर पोलिस असल्याचा दावा करून कोणीही पैसे मागितल्यास पैसे पाठवू नका. अटकेची कागदपत्रे किंवा व्हॉट्सअॅप संदेशांवर आंधळा विश्वास ठेवू नका. संशयास्पद सायबर फसवणुकीची तक्रार 1930 या हेल्पलाइनवर किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर नोंदवा.

Web Title: Bhandara fraud cases fake documents digital arrest cyber crime ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • Bhandara
  • cyber crime
  • maharashtra

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
2

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
3

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू
4

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.