Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

Congress News: महाराष्ट्रात दुष्काळामुळे शेतकरी संकटात असताना भाजप नेत्यांच्या नवरात्रोत्सवावर १०० कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला आहे. आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 17, 2026 | 05:15 PM
दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? गरब्यावरील खर्चावरून काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? गरब्यावरील खर्चावरून काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • ‘जनतेला काटकसर सांगता, मग भाजप नेत्यांचे काय?
  • ‘गरब्यावरील खर्चावरून काँग्रेस आक्रमक
  • शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
 

मुंबई: राज्यात १९७२ पेक्षा भिषण दुष्काळ पडलेला आहे, ३०५ तालुक्याला या दुष्काळाची झळ पोहचलेली आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहे. एकीकडे महागाई तर दुसरीकडे पिण्याचे पाणी नाही, जनावरांना चारा नाही, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्यास पैसे नाहीत. दसरा-दिवाळी तोंडावर आली तरी सणासाठी हातात पैसा नाही अशी अत्यंत वाईट परिस्थिती असताना सत्ताधारी भाजपा नेते मात्र भपकेबाज इव्हेंटबाजीवर जवळपास १०० कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहेत, असा गंभीर आरोप करत अशा असंवेदनशील नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील काय, असा प्रश्न काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे. (Congress News)

गरब्याचे आयोजन करून करोडो रुपयांची उधळण

नागपूर मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना, अतुल लोंढे यांनी सांगितले की, सध्या नवरात्र उत्सव सुरु असून देवीची आराधना केली जात आहे पण सध्याची परिस्थिती पाहता उत्सव साधेपणाने साजरा करता येऊ शकतो. जनतेला काटकसर करण्याचे आवाहन करता आणि भाजपा नेतेच उत्सवाच्या नावाखाली गरब्याचे आयोजन करून करोडो रुपयांची उधळण करत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आ. संजय उपाध्याय, आ. विनोद शेलार यांनी गरब्यावर भरमसाठ खर्च केला आहे, हा प्रकार दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारा व जखमेवर मीठ चोळणारा विकृत प्रकार आहे.

Owaisi on Elon Musk : मोदींवर बोलणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींनी सुनावलं! स्टारलिंकबाबत ओवैसींची भूमिका चर्चेत!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली येथे नमो नमो नवरात्री उत्सव आयोजित केला असून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलनात गरब्यासाठी मोठा एअर कंडिशन मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात मोठमोठे झुंबर आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. मोठ्या स्वागत कमानी आणि एलईडी स्क्रीन्स, एलईडी लाईट्सचा झगमगाट करण्यात आला आहे. दररोज १० ते १५ हजार लोक या सहभागी होतात. यासाठी ७००० चौरस फूटांचा इनडोअर प्लॅटफॉर्म, २०००० फुटांचा आउटडोअर प्लॅटफॉर्म केला असून त्यासाठी ६० लाख रुपयांचा खर्च केला आहे.

गायक कलाकारांसाठी एकूण चार ते पाच कोटी रुपये खर्च

मंडपात २००० टनचा एसी, ज्याचे भाडे दररोज ६० लाख रुपये आहे. साउंड आणि लाईट्सवर दररोज २५ लाखांचा खर्च, मंडपासाठी २५ जनरेटर सेट्स, दररोजचे ६.५ लाख रुपयांचे भाडे. गुजराती लोकसंगीतातले सुप्रसिद्ध गायक आणि नृत्य कलाकारांना करोडो रुपये मोजून बोलावण्यात आले आहे. निलेश गढवी हा नावाजलेला गायक नवरात्रीमध्ये १ ते २ कोटी रुपये शुल्क आकारतो. कविता राम, सागर केंडूरकर, माधवी श्रीवास्तव, अंशिका चोणकर हे प्रसिद्ध गायक कला सादर करत आहेत. या कलाकारांची एका दिवसाची फी २ ते ५ लाख रुपये आहे. सिम्फनी बँड हा प्रसिद्ध बँड गायकांच्या दिमतीला आहे. संगीत आणि गायक कलाकारांसाठी एकूण चार ते पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंडपात विविध फुलांच्या आरासीवर आयोजकांकडून दररोज ३ ते ५ लाख रुपये खर्च केले जात आहेत. रवींद्र चव्हाण यांच्याकडून दररोज १ ते १.५ कोटींचा खर्च केला जात असून एकूण बजेट १८ ते २० कोटींच्या घरात आहे.

दररोज १० ते १५ कोटींची उधळपट्टी

रवींद्र चव्हाणच नाही तर भाजपचे मंत्री आशिष शेलार भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही गरब्याचे आयोजन केले असून यावर दररोज कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. दुष्काळाचे भान राखून सण उत्सव साधेपणात साजरे करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, मात्र मुख्यमंत्र्यांच्याच आवाहनाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री, आमदारांनीच हरताळ फासला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ ५००० रुपयांची मदत जाहीर करणाऱ्या सरकारमधील भाजपचे मंत्री आणि आमदारांकडून नवरात्री आणि गरबा आयोजनावर दररोज १० ते १५ कोटींची उधळपट्टी केली जात आहे असेही अतुल लोंढे म्हणाले..

छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपासवर प्रौढ प्रताप पुरंदर या भव्य महानाट्याचा स्तंभपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, माजी मंत्री भागवत कराड यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे पण त्यासाठी दुष्काळात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून भव्य कार्यक्रम करण्याची गरज काय? मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता प्रचंड असताना नेत्यांना सामाजिक भानही असू नये का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Web Title: Atul londhe criticizes bjp leaders ravindra chavan ashish shelar over alleged 100 crore garba event expenses sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Atul Londhe
  • BJP
  • Congress
  • maharashtra

संबंधित बातम्या

दुष्काळात गरबा इव्हेंटवर कोट्यवधींची उधळपट्टी? शेलार, चव्हाणांचा राजीनामा घेणार का? काँग्रेसचा सवाल
1

दुष्काळात गरबा इव्हेंटवर कोट्यवधींची उधळपट्टी? शेलार, चव्हाणांचा राजीनामा घेणार का? काँग्रेसचा सवाल

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना
2

Car Fire Accident: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तारळी नदी पुलाजवळ कारचा आगीचा भडका; पोलिसांच्या धाडसाने टळली मोठी दुर्घटना

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू
3

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
4

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.