Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Jobs: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! IBPS कडून PO आणि SO च्या पदांमध्ये मोठी वाढ

Government Jobs Updates : 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन' (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) भरती २०२६ साठी रिक्त पदांची संख्या वाढवली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 21, 2026 | 02:16 PM
bank

bank

Follow Us
Follow Us:

Government Jobs Updates : तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी बँकांमध्ये भरती करणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (IBPS) द्वारे काढण्यात आलेल्या बँक भरतीअंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता. आयबीपीएसकडून सरकारी बँकेत अधिकारी बनण्यासाठी अर्ज खिडकी उघडण्यात आली आहे. याअंतर्गत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

यंदा बँकेत भरल्या जाणाऱ्या पदांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत, या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकडे आधीच्या तुलनेत अधिक पदांवर निवड होण्याची संधी असेल. किती पदे वाढवण्यात आली आहेत आणि निवड प्रक्रिया काय असू शकते, हे लगेच जाणून घ्या.

PO आणि SO दोन्ही भरतींमध्ये वाढली पदे

IBPS द्वारे जारी केलेल्या सुधारित व्हेकन्सी डिटेल्सनुसार (Vacancies Details) पीओ भरतीमध्ये आता एकूण ७,३६५ पदे उपलब्ध आहेत. तर, स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) च्या १,०३५ पदांवर भरती केली जाईल. आधी जारी केलेल्या व्हेकन्सीनुसार पीओ भरतीमध्ये पदांची संख्या ६,७१५ आणि एसओ भरतीमध्ये ७३५ इतकी होती. दोन्हीमध्ये वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या निवडीची शक्यता अधिक वाढू शकते.

या बदलाचा काय परिणाम होईल?

रिक्त पदे वाढल्याने अधिक उमेदवारांना संधी मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, याचा अर्थ स्पर्धा कमी होईल असा अजिबात नाही. अंतिम निवड ही पूर्णपणे उमेदवारांची कामगिरी, कॅटेगरीनुसार कटऑफ आणि संबंधित बँकांच्या अंतिम रिक्त पदांवर अवलंबून असेल.

Sonam Wangchuk Wife: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पत्नीची खंबीर साथ! पण नेमक्या कोण आहेत गीतांजली अंगमो?

भरती प्रक्रियेत कोणताही बदल नाही

IBPS PO भरतीमध्ये उमेदवारांना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, पर्सनालिटी टेस्ट, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीच्या प्रक्रियेतून जावे लागेल. तर, SO भरतीमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. अशा स्थितीत उमेदवारांना परीक्षेच्या तयारीत कोणताही निष्काळजीपणा न करण्याचा सल्ला दिला जातो. उमेदवारांनी नियमित मॉक टेस्ट द्याव्यात, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात आणि वेळेच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे, असा सल्ला दिला जात आहे.

अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवा

उमेदवारांनी अ‍ॅडमिट कार्ड, परीक्षेची तारीख आणि इतर आवश्यक माहितीसाठी IBPS च्या अधिकृत वेबसाइटला नियमित भेट दिली पाहिजे. भरती प्रक्रियेशी संबंधित प्रत्येक नवीन अपडेट तिथेच जारी केले जाईल. वाढलेली व्हेकन्सी निश्चितपणे उमेदवारांसाठी एक सकारात्मक संकेत आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, त्यांच्यासाठी ही तयारी अधिक मजबूत करण्याची योग्य वेळ आहे.

NMIMS Vice Chancellor: प्रा. सौगत रे यांची एनएमआयएमएस विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती!

Web Title: Government jobs ibps po so recruitment 2026 increased vacancy details apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Banking Jobs
  • education
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!
1

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!

मुंबईतील AIIPMR मध्ये कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर; स्पेशालिस्ट पदांसाठी अशी केली जाईल निवड!
2

मुंबईतील AIIPMR मध्ये कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर; स्पेशालिस्ट पदांसाठी अशी केली जाईल निवड!

Azim Premji Scholarship 2026 साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; पात्र विद्यार्थिनींनी असा करा अर्ज
3

Azim Premji Scholarship 2026 साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; पात्र विद्यार्थिनींनी असा करा अर्ज

Ramon Magsaysay Award 2026: मॅगसेसे पुरस्कार २०२६ विजेत्या रूना खान कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्या समाज कार्याबाबत सविस्तर..
4

Ramon Magsaysay Award 2026: मॅगसेसे पुरस्कार २०२६ विजेत्या रूना खान कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्या समाज कार्याबाबत सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.