career (फोटो सौजन्य : social media)
सरकारी नौकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था (NESTS) ने देशभरातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये (EMRS) प्राचार्य, TGT, PGT आणि शिक्षकेतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 7267 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया १९ सप्टेंबर २०२५ रोजी सुरु झाली असून शेवटची तारीख २३ ओक्टोम्बर २०२५ आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट emrs.tribal.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
बड्या अधिकाऱ्याकडून महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी; केबिनमध्ये बोलावलं अन्…
कोणत्या पदांवर भरती?
या भरतीमध्ये विविध पदांवर अर्ज मागवण्यात येत आहे. यात २२५ पद प्राचार्य (प्रिंसिपल) साठी आहेत. १४६० पद पीजीटी, 3962 पद टीजीटी,५५० पद महिला स्टाफ नर्स, 635 पद हॉस्टल वार्डन, ६१ पद अकाउंटेंट, २२८ पद जूनियर सेक्रेटेरियट असिस्टेंट (JSA) १४६ पद लॅब अटेंडेंटसाठी आहेत.
आवश्यक पात्रता
शैक्षणिक योग्यता पदानुसार वेगवेगळे आहे.
वय मर्यादा किती?
वय मर्यादा पदानुसार तय करण्यात आले आहे. काही पदांसाठी अधिकतम आयु हे ३० वर्ष आहे, तर काही पदांसाठी ३५ वर्षे आहे. प्राचार्य पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ५० वर्षे आहे. वयाची गणना २३ ऑक्टोबर २०२५ रोजी केली जाईल. राखीव प्रवर्गांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क किती?
अर्ज शुल्क देखील आवश्यक आहे. मुख्याध्यापक पदासाठी ₹२,५००, पीजीटी आणि टीजीटी पदांसाठी ₹२,००० आणि शिक्षकेतर पदांसाठी ₹१,५०० शुल्क आहे. सर्व श्रेणीतील एससी, एसटी, पीएच आणि महिला उमेदवारांना कोणत्याही पदासाठी फक्त ₹५०० भरावे लागतील.
कसे कराल अर्ज?
सर्वात आधी अधिकृत वेबसाईट emrs.tribal.gov.in वर जा.
तिथे होमपेजवर असलेल्या लिंकवर क्लिक करा.
नवीन नोंदणी (New Registration) वर जा.
तिथे संपूर्ण तुमची माहिती प्रविष्ट करा.
नंतर लॉग इन करा आणि उर्वरित तपशील भरा.
त्यानंतर, तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरा.
तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर, प्रिंटआउट घ्या आणि तो सेव्ह करा.