Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govt Jobs: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी नोकरीची संधी! आयटीआय उत्तीर्ण ते इंजिनिअर्स पदांसाठी भरती सुरू; पाहा पात्रता

Govt Jobs for Engineers 2026: आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेड (AVNL) मध्ये ज्युनिअर टेक्निशियन, मॅनेजर आणि इतर विविध पदांसाठी १२१३ जागांची भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 14, 2026 | 10:50 AM
avani

avani

Follow Us
Follow Us:

Govt Jobs for Engineers 2026: आर्मर्ड व्हीकल्स निगम लिमिटेडने (AVNL) वर्ष २०२६ साठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण १२१३ पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, या भरतीमध्ये आयटीआय (ITI) उत्तीर्ण तरुणांपासून ते इंजिनिअर्स, चार्टर्ड अकाउंटंट (CA), मानवी संसाधन (HR), मार्केटिंग आणि सायबर सुरक्षा यांसारख्या क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

या भरतीअंतर्गत सर्वाधिक १००५ जागा ज्युनिअर टेक्निशियन पदासाठी काढण्यात आल्या आहेत. याशिवाय २०८ जागा ज्युनिअर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, वरिष्ठ व्यवस्थापक, सल्लागार आणि अतिरिक्त महाव्यवस्थापक यांसारख्या कार्यकारी श्रेणीतील पदांसाठी आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ११ जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

‘या’ ट्रेड्समध्ये सर्वाधिक भरती

तांत्रिक पदांचा विचार केल्यास, फिटर (जनरल) साठी सर्वाधिक ४०० जागा उपलब्ध आहेत. यानंतर मशिनिस्टसाठी २१६ जागा, इलेक्ट्रिशियनसाठी ८४ जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी ६९ जागा, रॉ मटेरियल मॅनेजमेंट (OMHE) साठी ६६ जागा आणि वेल्डरसाठी ५५ जागा भरल्या जातील. याशिवाय फाउंड्रीमन, क्वालिटी अशुरन्स, पेंटर, इलेक्ट्रोप्लेटर, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स आणि इतर ट्रेड्समध्येही भरती केली जाणार आहे.

कार्यकारी श्रेणीमध्ये सर्वाधिक ९२ जागा ज्युनिअर मॅनेजर (मेकॅनिकल) च्या आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मानवी संसाधन (HR), मेटलर्जी, राजभाषा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वित्त, माहिती तंत्रज्ञान, मार्केटिंग, कंपनी सेक्रेटरी, जनसंपर्क, सायबर सुरक्षा आणि बौद्धिक संपदा यांसारख्या क्षेत्रांमध्येही नियुक्त्या केल्या जातील.

देशभरातील युनिट्समध्ये मिळणार पोस्टिंग

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती AVNL च्या विविध युनिट्समध्ये केली जाईल. यामध्ये चेन्नईतील आवडी येथील HVF, जबलपूरचे OFMK, मेडकचे MTPF, अंबरनाथचे EFA यांसह देशातील इतर केंद्रांचा समावेश आहे. या सर्व नियुक्त्या फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटच्या (Fixed Term Employment) तत्त्वावर केल्या जातील.

कोणत्या पदासाठी काय आहे पात्रता?

ज्युनिअर टेक्निशियन: संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (NTC/NAC) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

मॅनेजर पदांसाठी: ज्युनिअर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर यांसारख्या पदांसाठी संबंधित विषयात BE/BTech किंवा इतर विहित पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

इतर व्यावसायिक पदे: मानवी संसाधन (HR), वित्त, मार्केटिंग, राजभाषा, कंपनी सेक्रेटरी आणि जनसंपर्क यांसारख्या पदांसाठी संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

सल्लागार (वित्त आणि ऑडिट): उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट (CA) असावा आणि त्याला किमान १० वर्षांचा अनुभव असावा.

अतिरिक्त महाव्यवस्थापक (बिझनेस डेव्हलपमेंट): सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आणि १५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Study Tips to Focus: अभ्यास करताना मन विचलित होतेय? मग ‘या’ ५ सोप्या पद्धतींचा नक्की वापर करा..

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क

वयोमर्यादा: ज्युनिअर टेक्निशियनपासून ते डेप्युटी मॅनेजरपर्यंतच्या पदांसाठी कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल. वरिष्ठ व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि सल्लागार पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे आहे.

अर्ज शुल्क: सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३०० रुपये शुल्क आकारले जाईल. तर एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.

NEET UG 2026 Re-Exam: नीट यूजी पुनर्परीक्षेची ओएमआर (OMR) शीट जाहीर! ‘या’ तारखेला लागणार अंतिम निकाल!

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी AVNL च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ‘करिअर’ (Career) सेक्शनमध्ये नोंदणी करावी. त्यानंतर मोबाईल आणि ईमेलवर मिळालेल्या ओटीपीद्वारे पडताळणी करून लॉगिन करावे. अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरल्यानंतर फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अंतिम टप्प्यात अर्ज शुल्क ऑनलाईन भरून फॉर्म सबमिट करावा.

Web Title: Govt jobs avnl recruitment 2026 junior technician manager posts apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • government jobs
  • High salary Job
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज
1

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड
2

LIC HFL Recruitment 2026: MBA उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! LIC HFL मध्ये ५० पदांची भरती; दरमहा मिळणार ५० हजार रुपये स्टायपेंड

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज
3

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज

Central Bank of India Recruitment 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडियात भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे निवडीची संधी
4

Central Bank of India Recruitment 2026: सेंट्रल बँक ऑफ इंडियात भरती जाहीर; थेट मुलाखतीद्वारे निवडीची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.