
google job
How to get job in Google : प्रत्येक आयटी प्रोफेशनसचे जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलमध्ये (Google) काम करण्याचे स्वप्न असते. आकर्षक पगार पॅकेज, उत्कृष्ट वर्क कल्चर आणि जगा बदलणाऱ्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी प्रत्येकालाच खुणावते. गुगलमध्ये नोकरीसाठी लाखो अर्ज येतात, परंतु त्यापैकी मोजक्याच जणांना फायनल ऑफर लेटर मिळते. गुगलची हायरिंग प्रक्रिया अत्यंत कठीण असून येथे तांत्रिक कौशल्यासोबतच वर्तणूक आणि विचारांचीही कसून पारख केली जाते.
गुगलमध्ये जॉब मिळवणे म्हणजे केवळ चांगला रेझ्युमे पाठवणे नव्हे. त्यासाठी योग्य नेटवर्किंग, डेटा स्ट्रक्चर्सवर पकड आणि कंपनीच्या कल्चरमध्ये जुळवून घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. तुम्ही नुकतेच कॉलेज पासआउट झालेले फ्रेशर असाल किंवा अनेक वर्षांचा अनुभव असलेले प्रोफेशनल, सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखालील या दिग्गज कंपनीत प्रवेश मिळवण्याचा मार्ग अतिशय पारदर्शक पण आव्हानात्मक आहे. त्यामुळे आज आपण गुगलमध्ये नोकरी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया..
गुगलमध्ये अर्ज करण्याचा पहिला टप्पा म्हणजे प्रभावशाली रेझ्युमे तयार करणे. येथे सामान्य गोष्टींपेक्षा आकडेवारीवर भर दिला जातो. उदाहरणार्थ, ‘मी एका प्रोजेक्टवर काम केले’ असे लिहिण्याऐवजी, ‘मी प्रोजेक्ट X वर काम करून सिस्टीमची कार्यक्षमता ३०% वाढवली’ असे लिहा. तुम्ही कोडर असल्यास तुमचा गिथब प्रोफाईल आणि लिंक्डइन अपडेट असणे अत्यंत गरजेचे आहे.
अर्ज करण्यासाठी गुगलचे करिअर पोर्टल उपलब्ध आहेच, परंतु सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे ‘एम्प्लॉई रेफरल’. गुगलमध्ये काम करणारी कोणतीही व्यक्ती तुमचा रेझ्युमे अंतर्गत रेफर करत असेल, तर रेझ्युमे शॉर्टलिस्ट होण्याची शक्यता ८०% पर्यंत वाढते. त्यामुळे लिंक्डइनवर गुगलच्या कर्मचाऱ्यांशी नेटवर्किंग वाढवणे फायदेशीर ठरते.
रेझ्युमे निवडल्यानंतर खरी तांत्रिक कसोटी सुरू होते. गुगलच्या मुलाखतीमध्ये डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम (DSA) शी संबंधित कठीण प्रश्न विचारले जातात. LeetCode सारख्या प्लॅटफॉर्मवर कठीण प्रश्नांचा सराव करा. मुलाखतीदरम्यान कोड लिहिताना ‘थिंकिंग अलाउड’ (Thinking Aloud) पद्धत वापरा, म्हणजेच तुम्ही काय विचार करत आहात ते मुलाखतकाराला बोलून दाखवा.
गुगल केवळ हुशार कोडर शोधत नाही, तर तुम्ही एक चांगले व्यक्ती आणि टीम प्लेयर आहात का, हेदेखील तपासले जाते. ‘Googleyness’ राऊंडमध्ये तुमची नैतिकता, टीमसोबत काम करण्याची क्षमता, लीडरशिप क्वालिटी आणि कठीण परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता तपासली जाते. यात प्रामाणिकपणे उत्तरे देणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
तुमची मुलाखत घेणारी एकच व्यक्ती तुम्हाला जॉब मिळणार की नाही हे ठरवत नाही. सर्व मुलाखती पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण फीडबॅक एका स्वतंत्र ‘हायरिंग कमिटी’कडे पाठवला जातो. ही कमिटी निष्पक्षपणे विचार करून तुम्हाला ऑफर लेटर द्यायचे की नाही हे ठरवते. सर्व काही सुरळीत पार पडल्यास तुम्ही टीम मॅचिंग आणि सॅलरी डिस्कशनच्या टप्प्यावर पोहोचता.