Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exam Tips: गुण वाढवण्याची सोपी किल्ली ‘बोर्ड परीक्षेपूर्वी सुधारा हस्ताक्षर’

बोर्ड परीक्षा जवळ आल्यावर अभ्यासासोबत हस्ताक्षराकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य बसण्याची सवय, संतुलित वेगाने लिहिणे आणि अक्षरांची स्पष्टता यामुळे उत्तरपत्रिका अधिक आकर्षक दिसते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 30, 2025 | 06:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बोर्ड परीक्षा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या काळात अभ्यासासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा अनेक विद्यार्थी दुर्लक्ष करतात, तो म्हणजे हस्ताक्षर. चांगले हस्ताक्षर तुमच्या बोर्ड परीक्षेतील गुणांवर थेट परिणाम करते. अनेकदा विद्यार्थ्यांना संपूर्ण उत्तर माहिती असते, पण हस्ताक्षर अस्पष्ट असल्यामुळे परीक्षकाला ते नीट वाचता येत नाही. त्यामुळे अपेक्षित गुण मिळत नाहीत. स्पष्ट, स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षर केवळ तुमच्या ज्ञानाचेच नव्हे, तर तुमच्या मेहनतीचेही दर्शन घडवते आणि परीक्षकावर सकारात्मक प्रभाव टाकते. म्हणूनच परीक्षेपूर्वी हस्ताक्षर सुधारण्यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

बना खतरो के खिलाडी, घेऊन फिरा सीडी बंबा गाडी! फायर इंजिनिअर म्हणून कसे करावे करिअर?

लिहिताना बसण्याची योग्य स्थिती ठेवा

बहुतेक विद्यार्थी लिहिताना कशी बसतात, याकडे लक्ष देत नाहीत. वाकड्या पद्धतीने किंवा कुबड्याने बसून लिहिल्याने हात लवकर थकतो आणि अक्षरे बिघडतात. लिहिताना नेहमी सरळ बसा, पाय जमिनीवर ठेवा आणि वही थोडीशी तिरकी ठेवा. यामुळे हाताची हालचाल सहज होते आणि अक्षरांची रचना अधिक नीट होते.

खूप वेगाने लिहू नका

अनेक विद्यार्थ्यांना वाटते की जितके जलद लिहू, तितके जास्त गुण मिळतील. पण प्रत्यक्षात तसे नसते. खूप वेगाने लिहिल्यास अक्षरे गोंधळात पडतात आणि शब्द ओळखणे कठीण होते. सुरुवातीला हळूहळू आणि स्पष्ट लिहा. प्रत्येक अक्षर पूर्ण होत आहे याची खात्री करा. हाताला सवय लागल्यानंतर लिहिण्याचा वेग आपोआप वाढतो.

उत्तरे स्मार्ट पद्धतीने लिहा

फक्त हस्ताक्षरच नव्हे, तर उत्तरांची मांडणीही गुण वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. प्रत्येक उत्तर छोटे-छोटे परिच्छेद करून लिहा. आवश्यक तेथे उपशीर्षके, मुद्देसूद मुद्दे (पॉइंट्स) वापरा. महत्त्वाचे शब्द अधोरेखित केल्यास परीक्षकाचे लक्ष पटकन त्या मुद्द्यांकडे जाते. त्यामुळे उत्तर अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपे होते.

आता मोक्कार पैसे कमवायचे असतील तर टेन्शन नका घेऊ! ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रात घडवा करिअर

लहान सवयी, मोठा फरक

हस्ताक्षर सुधारण्यासाठी तासन्तास बसून सराव करण्याची गरज नाही. दिवसातून केवळ १० ते १५ मिनिटे नीट आणि लक्षपूर्वक लिहिण्याचा सराव पुरेसा ठरतो. रोज थोडा वेळ दिल्यास काही आठवड्यांतच हस्ताक्षरात लक्षणीय सुधारणा दिसून येते. बोर्ड परीक्षेच्या तोंडावर हस्ताक्षर सुधारणे ही तुमच्या हातात असलेली एक सोपी संधी आहे. योग्य बसण्याची सवय, संतुलित वेग, स्वच्छ मांडणी आणि नियमित थोडासा सराव केल्यास तुमची उत्तरपत्रिका अधिक आकर्षक बनेल आणि गुण वाढण्यास नक्कीच मदत होईल.

Web Title: How to keep handwriting good

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 06:03 PM

Topics:  

  • Exam

संबंधित बातम्या

CSIR NET डिसेंबर 2025 परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! उत्तरपत्रिका व आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया होणार सुरू
1

CSIR NET डिसेंबर 2025 परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! उत्तरपत्रिका व आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया होणार सुरू

‘परीक्षा पे चर्चा’ : नोंदणीत अनुत्साह! टार्गेट ६५ लाख असतानाही प्रत्यक्षात ३ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
2

‘परीक्षा पे चर्चा’ : नोंदणीत अनुत्साह! टार्गेट ६५ लाख असतानाही प्रत्यक्षात ३ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.