Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story : वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी झाली IAS अधिकारी! ईश्वर्या रामनाथन : नेत्रदिपक कामगिरी

ईश्वर्या रामनाथन यांनी UPSC Civil Services Examination अवघ्या २४ व्या वर्षी उत्तीर्ण करत आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. तामिळनाडूतील कुड्डालोर येथील शेतकरी कुटुंबातून येत त्यांनी कठोर परिश्रमाने यश मिळवले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 29, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी UPSC Civil Services Examination उत्तीर्ण करणे अनेक तरुणांचे स्वप्न असते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात, मात्र मोजक्यांनाच यश मिळते. अशाच कठीण स्पर्धेत शेतकऱ्याच्या मुलीने उल्लेखनीय यश मिळवत प्रेरणादायी उदाहरण घडवले आहे. ईश्वर्या रामनाथन यांनी अवघ्या २४ व्या वर्षी आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला.

अहिल्यानगरसाठी ऐतिहासिक क्षण! ‘सिव्हिल’मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू; प्रवेश प्रक्रिया कधीपासून? जाणून घ्या

तामिळनाडूतील कुड्डालोर येथे जन्मलेल्या ईश्वर्याचे वडील शेतकरी असून आई सरकारी नोकरीत आहेत. लहानपणापासूनच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. बालपणात आलेल्या पूर, चक्रीवादळ आणि विशेषतः २००४ च्या त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. याच अनुभवांमुळे समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.

ईश्वर्याने २०१७ मध्ये चेन्नईतील अण्णा विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आणि त्याच काळात यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया ६३० वा क्रमांक मिळवत रेल्वे सेवेत स्थान मिळवले. मात्र त्यांनी समाधान न मानता पुन्हा प्रयत्न केला आणि २०१९ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया ४७ वा क्रमांक मिळवत आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. आज त्या तामिळनाडूतील तिरुवल्लूर येथे उपजिल्हाधिकारी (SDM) म्हणून कार्यरत आहेत.

CSE की AI & Data Science; इंजिनिअरिंग प्रवेशापूर्वी ‘हा’ फरक जाणून घ्या, करिअरसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

ईश्वर्या यशाचे श्रेय आत्मविश्वास, सातत्य आणि योग्य नियोजनाला देतात. त्यांच्या मते, परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम नीट समजून घेणे आणि त्यानुसार वेळापत्रक तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ अभ्यास नव्हे, तर योग्य रणनीती आणि उत्तर लेखनाचा सरावही तितकाच गरजेचा आहे. त्यांनी उमेदवारांना सल्ला देताना सांगितले की, स्पष्ट ध्येय, प्रभावी योजना आणि नियमित मेहनत यामुळे कोणतीही कठीण परीक्षा जिंकता येते. आज ईश्वर्या रामनाथन यांची यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मर्यादित साधनसामग्री असूनही मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी झटल्यास यश निश्चित मिळते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.

Web Title: Ias iswarya ramanathan success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • ias
  • IPS

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.