फोटो सौजन्य - Social Media
गृहमंत्रालयाअंतर्गत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) तर्फे Security Assistant (Motor Transport)/Executive या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण ४५५ रिक्त पदांवर ही भरती होणार असून, १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशाचा डोमिसाइल सर्टिफिकेट, स्थानिक भाषेचं ज्ञान, तसेच वैध ड्रायव्हिंग लायसन्स व किमान १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करण्याची आणि स्थिर शासकीय करिअर घडवण्याची ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी नक्की अर्ज करावा.