फोटो सौजन्य - Social Media
भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) विविध तांत्रिक शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती करत आहे. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, आर्किटेक्चर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या शाखांमध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी एकूण 976 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट aai.aero द्वारे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
विभागनिहाय जागांची माहिती अशी आहे
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर) : 11
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) : 208
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल इंजिनिअरिंग) : 199
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (माहिती तंत्रज्ञान) : 31
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) : 527
अर्ज प्रक्रिया
भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI) तर्फे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती सुरू आहे. उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट aai.aero वर लॉगिन करावे. होमपेजवरील ‘Career’ विभागात जाऊन ज्युनियर एक्झिक्युटिव्ह भरती 2025 या नोटिफिकेशनवर क्लिक करावे. त्यानंतर नवीन पेज उघडेल, जिथे मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि इतर आवश्यक माहिती भरून नोंदणी करावी. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील तसेच GATE परीक्षेचा स्कोअर भरावा. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
अर्ज करताना उमेदवारांनी वर्गानुसार लागणारे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे. फॉर्म सबमिट केल्यावर त्याची प्रिंटआउट काढणे आवश्यक आहे, जी भविष्यातील प्रक्रियेसाठी उपयोगी ठरेल.
AAI ची ही भरती GATE स्कोअरवर आधारित असून, तरुण अभियंत्यांसाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. या भरतीत सहभागी होऊन उमेदवार आपले करिअर सरकारी क्षेत्रात स्थिर आणि सक्षम बनवू शकतात.
ही प्रक्रिया अर्ज करणाऱ्यांसाठी सोपी असून, संपूर्ण माहिती आणि आवश्यक दस्तऐवजांसह ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. योग्य तयारीसह उमेदवार या संधीचा फायदा घेऊन भविष्याची नोकरी निश्चित करू शकतात.