आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती
बँकिंग क्षेत्रामध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने (आयडीबीआय) 29 जून 2024 रोजी स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता ज्या उमेदवारांना आयडीबीआय बँकेमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून काम करायचे आहे. त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी असणार आहे.
काय आहे अर्जसाठीची मुदत?
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू होणार असून, उमेदवारांना 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, असे आयडीबीआय बँकेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
संस्थेचे नाव : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया
रिक्त पदांची संख्या : 31 पदे
रिक्त असलेली पदे : डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 1 जुलै ते 15 जुलै 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.idbibank.in
आवश्यक शैक्षणिक पात्रता?
विविध पदांनुसार बीई, बीटेक, एमसीए, एमएससी, एमबीए, सीए शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज करू शकणार आहे. यातील काही पदांसाठी अनुभव असणे आवश्यक आहे. तर काही पदांसाठी पदवीधर विद्यार्थी देखील अर्ज करू शकणार आहे. याशिवाय विविध पदांसाठी वयोमर्यादा ही देखील वेगवेगळी असणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचा.
किती मिळणार पगार?
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियामध्ये निवड झालेल्या डेप्युटी जनरल मॅनेजर (श्रेणी अ) पदासाठी 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. हे वेतन मेट्रो शहरांमध्ये 1 लाख 90 हजार रुपयांपर्यंत असणार आहे. असिस्टंट जनरल मॅनेजरचे (ग्रेड सी) वेतन 1 लाख 57 हजार रुपयांपर्यंत असणार आहे. हे वेतन मेट्रो शहरांमध्ये 1 लाख 90 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.