फोटो सौजन्य - Social Media
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 2 एप्रिल 2025 रोजी मुख्य परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक आपल्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली आहे. SBI जूनियर असोसिएट किंवा क्लर्क पदांसाठी 10 एप्रिल २०२५, तसेच 12 एप्रिल 2025 रोजी मुख्य परीक्षा घेणार आहे. प्रवेश पत्र हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे, जे परीक्षा स्थळावर उपस्थित राहण्यासाठी आवश्यक आहे. उमेदवारांना परीक्षेच्या स्थळी प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश पत्र आणि त्यावर दिलेल्या आवश्यक दस्तऐवजांसह ते घेऊन जाण्याची सूचना केली आहे. ज्यांनी जूनियर असोसिएट किंवा क्लर्क पदांसाठी पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून प्रवेश पत्र डाउनलोड करता येईल.
SBI क्लर्क मुख्य परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रदान करावे लागतील. यामध्ये नोंदणी क्रमांक, रोल नंबर, जन्म तारीख आणि पासवर्ड यांचा समावेश असेल. उमेदवार या माहितीच्या आधारे थेट लिंकवरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. SBI ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर हे प्रवेश पत्र जारी केले आहे. उमेदवारांनी प्रवेश पत्र डाउनलोड करून ते परीक्षा स्थळावर आवश्यक दस्तऐवजांसह घेऊन जाण्याची सूचना केली आहे.
SBI क्लर्क मुख्य परीक्षा 2025 चार महत्त्वाच्या विभागांमध्ये घेण्यात येईल.पाहिल्या विभागात सामान्य/आर्थिक जागरूकता याचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात सामान्य इंग्रजी तर तिसरा विभाग गणितीय योग्यतेचा आहे. तर चौथ्या विभागात तर्कशक्ती व संगणकाची योग्यता याचा समावेश आहे. प्रत्येक परीक्षेचा वेगळा वेळ असेल, आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जातील. परीक्षा 10 आणि 12 एप्रिल 2025 रोजी देशभरात घेण्यात येईल.
SBI क्लर्क प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या पायऱ्या अनुसराव्यात. पहिले, अधिकृत वेबसाइटच्या करिअर सेक्शनमध्ये जाऊन “RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES)” शोधावे, त्यानंतर कॉल लेटर लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे. नंतर, प्रवेश पत्र डाउनलोड करून त्याच्या तपशीलांची तपासणी केली जाऊ शकते.