Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT मुंबईत ‘ई-यंत्रा’ रोबोटिक्सचा थरार! देशभरातील तरुण अभियंत्यांनी सादर केले भन्नाट आविष्कार; कृषी क्षेत्रासाठी ‘स्मार्ट’ उपाय

नुकत्याच झालेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात देशभरातील तरुण अभियंत्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि तांत्रिक कौशल्याचा प्रभावी आविष्कार सादर केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 05, 2026 | 06:32 PM
IIT मुंबईत 'ई-यंत्रा' रोबोटिक्सचा थरार! देशभरातील तरुण अभियंत्यांनी सादर केले भन्नाट आविष्कार

IIT मुंबईत 'ई-यंत्रा' रोबोटिक्सचा थरार! देशभरातील तरुण अभियंत्यांनी सादर केले भन्नाट आविष्कार

Follow Us
Follow Us:

 

  • आयआयटी मुंबईत ‘ई-यंत्रा’ रोबोटिक्सचा थरार!
  • देशभरातील तरुण अभियंत्यांनी सादर केले भन्नाट आविष्कार
  • कृषी क्षेत्रासाठी ‘स्मार्ट’ उपाय
E-Yantra Robotics Competition: आयआयटी मुंबई येथे संगणक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने आयोजित ई-यंत्रा रोबोटिक्स स्पर्धा आणि इंनोव्हशन चॅलेंजेस या राष्ट्रीय स्पर्धांचा ग्रैंड फिनाले मोठ्या उत्साहात पार पडला. नुकत्याच झालेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात देशभरातील तरुण अभियंत्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि तांत्रिक कौशल्याचा प्रभावी आविष्कार सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या ई-यंत्रा उपक्रमाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या धर्तीवर प्रोजेक्ट-आधारित शिक्षणाला चालना देत नव्या पिढीतील संशोधक आणि नवोन्मेषक घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या स्पर्धेत देशातील १६ राज्यांमधील ५१ महाविद्यालयांमधून निवड झालेल्या २२३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण १०४७संस्थांमधून ही निवड करण्यात आली होती. यामध्ये डिप्लोमा तसेच पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. ‘थीम रन’मध्ये ४१ संघांनी स्पर्धा केली, तर १९ संघांनी प्रोजेक्ट प्रदर्शनात आपली संकल्पना मांडली.

स्पर्धेत ११६ मुले आणि ३७ मुलींनी दर्शवली हजेरी

इनोव्हेशन चॅलेंजमध्ये ५९ अंतिम स्पर्धक (३६ मुले, २३ मुली) आणि १३ शिक्षक सहभागी झाले. रोबोटिक्स स्पर्धेत १५३ विद्यार्थी (११६ मुले, ३७ मुली) सहभागी झाले होते. या सहभागातून स्टेम क्षेत्रात मुलींचा वाढता सहभाग दिसून आला. या स्पर्धेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. क्वाडुपेड रोबोट, प्रगत रोबोटिक आर्म्स, सेल्फ-बॅलन्सिंग रोबोट, टोमॅटो सॉर्टिंग प्रणाली आणि ‘रिइनफोर्समेंट लर्निंग ‘चा वापर यांसारख्या प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमादरम्यान’ संशोधनातील करिअर’ आणि ‘कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची भूमिका’ या विषयांवर तज्ज्ञांची चर्चासत्रेही झाली.

शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणार! शिक्षक पदभरतीत सर्वाधिक गुणधारकांनाच मिळणार प्राधान्य

कमी खर्चामध्ये आता पोर्टेबल उपाय उपलब्ध

उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे काही प्रकल्पांनी प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर उपाय सुचवले. मल्टी-क्रॉप्स डीहस्कर या उपकरणामुळे सुपारीसारख्या पिकांच्या प्रक्रियेसाठी कमी खर्चात पोर्टेबल उपाय उपलब्ध झाला आहे. अग्रीनोव्हा स्मार्ट ओनियन स्टोरेज सिस्टमने आयओटी तंत्रज्ञानाच्या मदतीने साठवणुकीतील नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला, तर ऍग्रोवाल्ट या प्रकल्पाने एआय व सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नसाठ्याचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम केले.

उद्योजकता आणि रोजगारक्षमतेसाठी चालना

ई-यंत्राचे संस्थापक कवी आर्या यांनी विद्यार्थ्यांना ‘ज्ञानाचे ग्राहक नव्हे तर ज्ञाननिर्माते’ बनवण्याचा उद्देश स्पष्ट केला. तर शिवराम कल्याणकृष्णन यांनी भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित निर्णयक्षम प्रणालींचा समावेश करून या उपक्रमाला अधिक सक्षम करण्याचा दृष्टिकोन मांडला. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि रोजगारक्षमतेला चालना मिळत असून, देशातील तांत्रिक शिक्षणाला नवी दिशा मिळत असल्याचे स्पष्ट झाले.

शिक्षकांच्या उन्हाळी सुट्या जनगणनेत! १६ मेपासून जनगणना प्रारंभ; शिक्षकांमध्ये नाराजी

Web Title: Iit bombay e yantra robotics competition grand finale innovations agriculture tech

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Career News
  • IIT Bombay
  • Robot

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
1

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार
2

Maharashtra TET Scam: TET उमेदवारांसाठी मोठी बातमी! निकाल रद्द होणार, पण पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
3

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी
4

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.