
X New Update: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आजकाल सोशल मीडियावर छोट्या क्लिप्स शेअर करण्याचा ट्रेंड जोरात चाललाय. टिकटॉक बंद झाल्यापासून इंस्टाग्रामवर रील्स बनवण्याचा ट्रेंड आला. बरेच व्हिडिओ बनवणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकत असतात. यामुळे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, आणि व्हिडिओ बनवणाऱ्याला पैसे कमवायची संधी पण मिळते. X New Update:
पण इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्याचे पैसे मिळत नाहीत. मात्र आता X ने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन व्हिडिओ क्लिपिंग टूल आणलंय. यामुळे आता लोकांना यातून पैसे पण कमवता येणार आहेत.
X ने बनवलेलं हे नवीन साधन लोकांची एक मोठी अडचण सोडवतं. आधी मोठ्या व्हिडिओमधून छोटी क्लिप काढायची असेल तर दुसरं अॅप किंवा एडिटिंग सॉफ्टवेअर लागायचं. पण आता हे काम X अॅपमध्येच होणार आहे. X ने @XCreators या अकाऊंटवरून अधिकृत पोस्ट टाकून लोकांना या नव्या फीचरबद्दल सांगितलं.
या फीचरचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, जेव्हा एखादी क्लिप शेअर केली जाईल, तेव्हा त्यावर ‘क्लिप फ्रॉम’ असं लिहिलेलं येईल. त्या लेबलवर क्लिक केलं की लोक थेट मूळ व्हिडिओवर पोहोचतील. यामुळे फक्त शेअर करणाऱ्याचाच फायदा होणार नाही, तर मूळ व्हिडिओ बनवणाऱ्याला पण पूर्ण क्रेडिट मिळेल आणि त्याला जास्त लोक बघतील.
X ने सोमवारी या नव्या फीचरची घोषणा केली. या नव्या फीचरमध्ये लोकांना आता व्हिडिओ डाऊनलोड करून दुसऱ्या एडिटिंग अॅपवर जायची गरज पडणार नाही. त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होणार आहे. ते X मध्येच व्हिडिओचा एक छोटा भाग निवडून क्लिप बनवू शकतील. नंतर ते आपलं मत आणि कमेंट टाकून ती थेट आपल्या टाईमलाईनवर पोस्ट करू शकतील. सध्या हे फीचर iOS आणि अँड्रॉइड वाल्यांसाठी आलंय. वेबसाईटवर हे नंतर येणार आहे.
या फीचरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पैसे कमवायची संधी. X च्या ओरिजिनल कंटेंट रिवॉर्ड्स प्रोग्रामनुसार, क्लिप बनवणारा माणूस आणि मूळ व्हिडिओचा मालक दोघेही पैसे कमवू शकतात. पण यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील.
UGC NET December 2026 Exam: UGC NET चं बिगुल वाजलं! डिसेंबर परीक्षेचं विषयानुसार वेळापत्रक जाहीर
तुमच्याकडे X प्रीमियम सबस्क्रिप्शन असायला हवं. कमीत कमी 500 व्हेरिफाईड फॉलोअर्स असायला हवेत. आणि गेल्या 90 दिवसात 5,00,000 व्हेरिफाईड इम्प्रेशन्स असायला हवेत. म्हणजे असं आहे, फक्त क्लिप टाकून पैसे मिळणार नाहीत. आधी तुमचं अकाऊंट थोडं मोठं करावं लागेल. फॉलोअर्स वाढवावे लागतील. पण एकदा अटी पूर्ण झाल्या की छोट्या क्लिपमधून पण कमाई सुरू होईल. ज्यांना व्हिडिओ बनवायचा आहे, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.